पुणे

डेटाचोरीचा प्रकार संतापजनक ः काँग्रेस

CD

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, ता. २१ ः ‘‘आपल्या डेटाची चोरी झाल्याचे  देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाला  स्वतःहून समजू नये ही अतिशय चिंतेची बाब आहे. ज्या ग्राहकांची माहिती चोरी झाली त्यांना बँकेने अद्यापही  कल्पना देऊ नये हे आणखीच संतापजनक  आहे,’’ असे काँग्रेसने  म्हटले आहे. 
‘‘स्टेट बँकेच्या तीन लाख ७५ हजार डेटा रेकॉर्ड्समध्ये सायबर हल्लेखोरांनी घुसखोरी केली असून त्यातील तीन हजार ८९७ ग्राहकांचे  मोबाईल क्रमांक, जन्मतारखा, नाव, ईमेल, घरचा पत्ता, बँक शाखेची माहिती आणि कर्जाशी संबंधित तपशील यासारखी  अतिशय महत्त्वाची वैयक्तिक माहिती हॅकर्सच्या हाती लागली आहे,’’ याकडे  काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख खासदार पवन खेडा यांनी लक्ष वेधले.   

‘दोषींवर कारवाई करा’
‘‘बँकेच्या ग्राहकांची माहिती ‘डार्क वेब’वर उघड झाली असल्याचे  एका बाहेरच्या संस्थेने सावध केल्यावर स्टेट बँकेला  समजले. कोट्यवधी लोकांच्या पैशांची आणि आर्थिक सुरक्षेची जबाबदारी असलेल्या बँकेकडून डेटा सुरक्षेच्या बाबतीत असा गंभीर प्रकार अजिबात सहन केला जाऊ शकत नाही. स्टेट बँकेने त्यावर  ग्राहकांना उत्तर दिलेच पाहिजे आणि ज्यांच्या चुकीमुळे हा प्रकार घडला, त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे,’’ अशी मागणी काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख खासदार पवन खेडा यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: अंतराळात डेटा सेंटर, जमिनीवर एआयचा विस्तार! काय आहे एलॉन मस्क यांचा जगाला धडकी भरविणारा मास्टर प्लॅन?

आमचे हात बांधलेले नाहीत, निवडणूक प्रक्रियेत गडबड केल्यास शांत बसणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

Soybean Farm Fire : दुष्काळात कष्टाने जगवलेले पाच एकरवरील सोयाबीन जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा शेतकऱ्याचा संशय

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT