पुणे

युनिटी करंडक क्रिकेट १

CD

फोटो ः आर्यन गोरे

स्केल अप अकादमीची विजयी सलामी

पुणे, ता. १९ ः युनिटी कमिटी आयोजित युनिटी करंडक क्रिकेट स्पर्धेत आर्यन गोरेच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर स्केल अप अकादमीने क्रिकेट नेक्स्ट अकादमीचा (सीएनए) आठ गडी राखून पराभव करीत विजयी सलामी दिली.
लोणी काळभोर येथील क्रिकप्लस मैदानावर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट नेक्स्ट अकादमीचा डाव १९८ धावांत आटोपला. या वेळी अमिताश मोझेने ४७ धावांची खेळी केली. आर्यन गोरेने चार, शर्विल झोडने तीन, तर श्लोक गुजरने दोन गडी बाद केले. प्रत्युत्तर देताना स्केल अप अकादमीने दोन बाद २०१ धावा करून विजय मिळविला. या वेळी विवान खेलानीने आठ चौकारांसह केलेली नाबाद ७० धावांची खेळी उपयुक्त ठरली. ‘सामनावीर’ हा मान आर्यन गोरेने पटकाविला.
या स्पर्धेच्या उद्‍घाटनप्रसंगी आर्यन्स संघाचे मुख्य प्रशिक्षक हर्षद पाटील, उद्योजक प्रवीण कामठे, स्पर्धा संचालक राहुल इंगवले, बापू तांबे हे उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक ः
क्रिकेट नेक्स्ट अकादमी (सीएनए) - (४५.५ षटकांत) सर्वबाद १९८ (अमिताश मोझे ४७, अनिश्वर मिश्रा २५, आर्यन गोरे ४-२१, शर्विल झोड ३-२८, श्लोक गुजर २-१२) पराभूत विरुद्ध स्केल अप अकादमी - (३९.२ षटकांत) २ बाद २०१ (विवान खेलानी नाबाद ७०, रुचिर मारणे ३६, अथर्व कोडग नाबाद २३, देवांग माचा १-२८).
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bishnoi Gang Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर मोठी खळबळ; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होते 'हे' काँग्रेसचे माजी आमदार!

Bhagwangad News : भगवानगडाच्या चतुर्थ महंतपदी कृष्णा महाराज शास्त्री विराजमान होणार; दुष्काळामुळे सोहळा साधेपणाने

Law Courses : विधी अभ्यासक्रमाला मुलींची पसंती; प्रवेशाचे प्रमाण ४३.३८ टक्क्यांवर

IND vs NZ, Schedule: भारताचा T20 संघ न्यूझीलंडला पोहोचला! वैभव सूर्यवंशीसोबत फॅन्सने घेतले सेल्फी, भुवीही कमबॅकसाठी सज्ज

Latest Marathi News Live Update : गोकुळचा निकाल आता फेरमतमोजणीच्या फेऱ्यात, जल्लोषानंतर आकडे बदलले; लेटेस्ट अपडेट वाचा

SCROLL FOR NEXT