Crematorium
Crematorium Sakal
पुणे

पुणे : जिल्ह्यात ७६८ गावांमध्ये ८८९ शवदाहिनी उभारणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावांमधील स्मशानशेडमध्ये लोखंडी शवदहिनी' बसविण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेने खास योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७६८ गावांमध्ये मिळून ८८९ गावांमध्ये शवदाहिण्या सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा परीक्षेच्यावतीने प्रत्येक शवदाहिणीसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या निधीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावांमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या प्रत्येक स्मशानभूमीत आता शवदाहिणी सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी रविवारी (ता.२२) सांगितले.

एलपीजी जोडणीसाठी उज्ज्वला योजना जिल्हाभरात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात झाडांची तोडणी आता अंत्यविधीसाठी लागणाऱ्या लाकडासाठी केली जात आहे. यानुसार प्रत्येक मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी प्रत्येकी किमान तीन आणि कमाल पाच क्विंटल लाकूड वापरले जात आहे. या शवदहिणींची रचना महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाने केली असून, अभियांत्रिकी कॉलेज आणि अभियांत्रिकी सल्लागारच्या विविध तज्ज्ञांनी त्याची पडताळणी केली आहे.

वार्षिक मृत्य व अंत्यसंविधी स्थिती

पुणे जिल्ह्याचा मृत्यू दर ---- ०.६ टक्के

जिल्ह्यात मृत्युनुसार दरवर्षी होणारे सरासरी एकूण मृत्यू --- सुमारे ३० हजार.

जिल्ह्यातील अंत्यविधीसाठी वर्षात आवश्यक लाकूड ---- सुमारे १० हजार मेट्रिक टन.

अंत्यविधीमुळे होणारे वार्षिक कार्बन उत्सर्जन ----सुमारे ४० हजार मेट्रिक टन.

तालुकास्तरीय गावे अन शववाहिणींची संख्या (टीप :- तालुका, गावे आणि शववाहिणी संख्या या क्रमाने)

आंबेगाव ---- ३४ ----३४

बारामती ----४३ ----४३

भोर ----४७ ----४७

दौंड ----५१ ----५१

हवेली --- ३४ ---- ३४

इंदापूर ----६३ ----६३

जुन्नर ----७४----७९

खेड ----१०२ ----११०

मावळ ----‌९२ ----११९

मुळशी ----४५ ----७२

पुरंदर ---- ४९ ---- ७३

शिरूर ----७० ---- ८४

वेल्हे ---६४ ----८०

एकूण ---- ७६८ ----८८९

या शववाहिण्यांमुळे अंत्यविधीसाठी लागणाऱ्या लाकडात ५० टक्के कपात होणार आहे. शिवाय पर्यावरण रक्षण होण्यास मदत होईल. पर्यायाने जिल्ह्यातील जैवविविधता टिकून राहण्यास फायदा होणार आहे.

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT