Scholarship 
पुणे

शिष्यवृत्ती परीक्षा १६ फेब्रुवारीला

सकाळवृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रात परीक्षा केंद्रांचा पत्ता चुकल्याची बाब समोर आली. दरम्यान, परीक्षा केंद्राचे योग्य पत्ते संबंधित शाळांना कळविण्यात येतील, असे राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.

या परीक्षेसाठी दोन पेपर असतील. पहिला पेपर सकाळी अकरा ते दुपारी साडेबारा या वेळेत होईल. यात प्रथम भाषा विषयाचे २५ प्रश्‍न असतील, त्याला ५० गुण; तर गणित विषयातील ५० प्रश्‍नांसाठी १०० गुण, असा एकूण १५० गुणांचा पेपर असेल. या परीक्षेचा दुसरा पेपर दुपारी दीड ते तीन या वेळेत होईल. 

तृतीय भाषा विषयात ५० गुणांचे २५ प्रश्‍न, तर बुद्धिमत्ता चाचणीचे १०० गुणांचे ५० प्रश्‍न असतील.

पाचवी आणि आठवीच्या परीक्षेसाठी वेगवेगळी परीक्षा केंद्रे असतील. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाचवीसाठी ३०३ केंद्रे, आठवीसाठी १७५, पुणे महानगरपालिका हद्दीत पाचवीसाठी ६४, आठवीसाठी ३९, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका हद्दीत पाचवीसाठी ४८ आणि आठवीसाठी २९ परीक्षा केंद्रे असतील. 

परीक्षा केंद्रे ही विविध शाळांमध्ये देण्यात आली आहेत. त्यांचा पत्ता परिषदेने परीक्षेच्या प्रवेशपत्रावर दिलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT