Pune Municipal Corporation E sakal
पुणे

Scholarship : महापालिकेच्या शिष्यवृत्तीसाठी ९ ऑक्टोरपासून करता येणार अर्ज

पुणे महापालिकेतर्फे इयत्ता दहावी आणि बारावीत ८० टक्केपेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल जाते. याचे ऑनलाइन अर्ज ९ ऑक्टोबरपासून स्वीकारण्यात येणार आहेत.

प्रशांत पाटील

पुणे - महापालिकेतर्फे इयत्ता दहावी आणि बारावीत ८० टक्केपेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल जाते. याचे ऑनलाइन अर्ज ९ ऑक्टोबरपासून स्वीकारण्यात येणार आहेत. दरम्यान यासाठी डिसेंबर अखेरपर्यंत मुदत असली तरी लोकसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.

महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे पुणे महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाह्य योजनेअंतर्गत १५ आणि इयत्ता १२वीच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शैक्षणिक अर्थसाह्य योजनेतून २५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.

दरवर्षी या योजनेतून जवळपास १० ते १२ हजार विद्यार्थी याचा लाभ घेतात. यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी १५ कोटी पेक्षा जास्त तरतूद उपलब्ध आहे.

यंदाच्या वर्षी अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण यासह इतर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली होती. त्यामुळे महापालिकेनेही शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया उशिरा सुरु केली आहे. ९ ऑक्टोबर पासून अर्ज स्वीकारण्यास सुरवात केल्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत यासाठी मुदत आहे.

त्यानंतर अर्जांची छाननी करून, त्यांचे पैसे थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी किमान तीन ते चार महिने लागतात. यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्यात लागू होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी पैसे जमा न झाल्यास विद्यार्थ्यांना पैसे जमा होण्यास जून महिन्यापर्यंत वाट बघावी लागू शकते.

समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास म्हणाले, ‘‘इयत्ता १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेसाठी ९ ऑक्टोबरपासून अर्ज स्वीकारले जातील, अर्ज भरण्याची मुदत ३१ डिसेंबर पर्यंत असेल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT