sinhgad fort sakal
पुणे

शाळा, मंदिरे सुरू होणार तर मग सिंहगड कधी सुरू होणार

कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाल्याने शाळा, मंदिरे उघडण्यासंदर्भात निर्णय झाले आहेत. कोरोनाचे नियम पाळून गड, किल्ले सुरू करा.

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला - कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाल्याने शाळा, मंदिरे उघडण्यासंदर्भात निर्णय झाले आहेत. कोरोनाचे नियम पाळून गड, किल्ले सुरू करा. सिंहगड पर्यटकांसाठी सुरू करावा. अशी मागणी, ग्रामस्थ व पर्यटकांच्याकडून होत आहे.

सिंहगडावरील स्थानिक विक्रेते, प्रवासी वाहतूक करणारे असे मिळून ४५० जण आहेत. त्यांच्या कुटुंबाची रोजचे जीवन जगणे अवघड झाले आहे. यामध्ये अवसरवाडी, सिंहगड, मोरदरी, कल्याण, पेठ, कोळीवाडा(सिंहगड), आतकरवाडी, गोळेवाडी(डोणजे), कोंढणपूर गावातील नागरिक आहेत.

मार्च २०२० पासून कोरोनामुळे सिंहगड पर्यटकांसाठी बंद आहे. त्याच्या अगोदर दोन- तीन वर्षे रस्ता तयार करणे, दरड प्रतिबंध जाळ्या बसविणे, दरड पडण्याची भीतीपोटी वेळोवेळी महिने महिने बंद होता. परिणामी गडावरील विक्रेते यांचे चार पाच वर्षात उत्पन्न घटले आहे.

सिंहगड बंद असल्याने गडावरील सर्व हॉटेल, दही ताक, सरबत, विविध वस्तू विकणारे विक्रेते, प्रवासी वाहतूक लोकांचे उत्पन्न ठप्प झाले आहे. शेती असणारे शेतात काम करतात. काही जण मोल मजुरी, शेतात मजुरीसाठी जात आहेत. आणि जीवन जगत आहेत. कोरोनाची नियमावली पाळून सिंहगड पर्यटकांसाठी सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी होत आहे. आम्ही ग्रामपंचायत मार्फत गड सुरू करण्याबाबत पत्रव्यवहार करणार आहे.

- मोनिका पढेर, सरपंच घेरा सिंहगड

ऐतिहासिक वास्तू, स्मारक सुरू झाले आहेत. मग सिंहगड का सुरू झाला नाही. याबाबत सांगताना उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी सांगितले की, 'कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी आणि पावसाळी पर्यटन बाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे सिंहगड सध्या बंद आहे. ऐतिहासिक वास्तू, स्मारक सुरू करण्याबाबतचा निर्णय आहे. तो वन विभागाशी निगडित नाही. सिंहगड हा वन विभागाच्या नियंत्रण अंतर्गत आहे. सिंहगड सुरू करण्याबाबत पालकमंत्री यांच्या सूचना, जिल्हाधिकारी यांचे आदेश आल्यावर सुरू करण्यात येईल.'

सिंहगडाचे पर्यटनावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या-

झुणका भाकरी हॉटेल्स- ६०-७०

खासगी प्रवासी वाहतुक वाहने- ६५-७०

दही- ताक, सरबत विक्रेते- २८० ते ३००

इतर- १५- २०

असे सर्व साधारण विक्रेते- ४५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बातम्या पेरून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आलेला, आता घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्याबद्दल खोटं पसरवतोय; धंगेकरांची आणखी एक पोस्ट

IND vs AUS, 2nd ODI: भारतीय संघाने सलग १७ वा टॉस हरला; प्लेइंग-11 मध्ये कुलदीपला संधी नाहीच, जाणून घ्या कसे आहेत दोन्ही संघ

Yavatmal Crime: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वाळू व्यावसायिकाची हत्या; वाळू उचल सीमेचा वाद, यवतमाळ जिल्‍ह्यातील घटना

Latest Marathi News Live Update : सलग आलेल्या दिवाळी सुट्ट्यांमुळे कोकणात पर्यटन हंगामाला सुरूवात

Police Smriti Din: इन्स्पेक्टर सुनील कुमार, दुर्गेश सिंह आणि सौरभ यांच्या शौर्याला सलाम! वाचा त्यांच्या बहादुरीची कहाणी

SCROLL FOR NEXT