पुणे

रहाटणी एसएनबीपीमध्ये पक्षी संवर्धनाची जनजागृती

CD

पिंपळे सौदागर, ता. २१ ः जागतिक चिमणी दिनानिमित्त राहटणी येथील एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूलतर्फे पक्षी संवर्धनाला चालना देण्यासाठी आणि पर्यावरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी घरटी बसविण्याचा (नेस्ट इन्स्टॉलेशन) उपक्रम शुक्रवारी (ता. २०) उत्साहात झाला.
या उपक्रमांतर्गत शाळेच्या परिसरात चिमण्यांची १२ घरटी बसविण्यात आली. नेचर फॉरेव्हर सोसायटीचे पुणे समन्वयक चंदन चौरसिया यांनी ही घरटी उपलब्ध करून दिली. उपक्रम समन्वयक बबिता बॅनर्जी आणि शिक्षकांनी नियोजन केले. प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणीय समतोल राखण्यात चिमण्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजले. शहरीकरणामुळे त्यांच्या अधिवासावर होणाऱ्या परिणामांचीही जाणीव झाली.
स्टेट बोर्ड प्राचार्या सोनल श्रीवास्तव, संचालक-प्राचार्या डॉ. जयश्री वेंकटरामन आणि चेअरमन डॉ. डी. के.भोसले यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमातून ‘लहान कृतीतून मोठा बदल शक्य आहे’ हा संदेश देण्यात आला.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या पुढील अध्यक्षा कोण? दोन दमदार महिला नेत्यांची नावे समोर, नव्या चेहऱ्यांबाबत मोठी माहिती समोर

तुंबाडची मंजुळा सिनेमा दिग्गज कलाकारांची मांदियाळी ! अनोखी कल्पना वापरत उलगडली कास्ट

Corporation Water Crasis : कोल्हापुरात पाणीपुरवठ्यावरून वाद; महापालिका-जलसंपदा आमनेसामने, पदाधिकाऱ्यांची कडक भूमिका

Pune-Nashik Railway: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट! निधी माघारी घेण्याची प्रक्रिया सुरु, कारण काय?

Financial Planning: 50,000 पगारातही बचत नाही? 15 दिवसांत पैसे संपतात? तज्ञांनी सांगितलेले हे 5 नियम वापरा आणि पैशांची टेन्शन संपवा

SCROLL FOR NEXT