School Bus Accident sakal
पुणे

शाळेच्या बसला अपघात; १०० फूट दरीत बस कोसळली

शाळेच्या बसला अपघात. या बसमध्ये 44 मुले व ५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण ४९ जण होते. १०० फूट दरीत बस कोसळून हा अपघात झाला.

चंद्रकांत घोडेकर

शाळेच्या बसला अपघात. या बसमध्ये 44 मुले व ५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण ४९ जण होते. १०० फूट दरीत बस कोसळून हा अपघात झाला.

घोडेगाव - गिरवली (ता. आंबेगाव) जवळील आयुका केंद्रावरून परत येताना शाळेच्या बसला अपघात झाला. या बसमध्ये 44 मुले व ५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण ४९ जण होते. १०० फूट दरीत बस (नंबर MH14-CW3553) कोसळून हा अपघात झाला. पिंपळगाव घोडे येथील मुक्ताई प्रशाला या हायस्कूलचे ते विद्यार्थी आहेत. मिळालेल्या माहिती नुसार, ४९ पैकी ४४ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच ४ शिक्षक व एक ड्रायव्हर जखमी झाले आहेत. 44 विद्यार्थ्यांना घोडेगाव ग्रामीण रुग्णालय व मंचर उपजिल्हा रुग्णालयात किरकोळ उपचार करण्यात आले. गंभीर रुग्णाना पुणे येथे हलवण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांना तपासणी करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही मुले आयुका केंद्रावर दुर्बीण पाहण्यासाठी शालेय अभ्यासासाठी साठी गेले होते. अपघात मोठा होता, परंतु सागाची झाडे असल्याने मोठे नुकसान झाले नाही. ही मोठी ३ झाडे तोडून बस दरीत कोसळली. घटनास्थळी साहेब पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी पोलिसांच्या मदतीने व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मुले बाहेर काढून घोडेगाव व मंचर येथील दवाखान्यात हलवले. आंबेगाव विद्या विकास मंडळ या संस्थेचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल होऊन मदत केली.

तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, संस्थेचे अध्यक्ष अजित काळे, माजी सभापती कैलास बुआ काळे, वळसे पाटील यांचे पीए रामदास वळसे पाटील हे देखरेख ठेवून मदत करत होते. जुन्नर येथील काही नागरिक पाहुण्यांकडे आले होते. त्यांनीही अपघातग्रस्तांना मोठी मदत केली. हा अपघात दोनच्या सुमारास झाला असल्याचे सरपंच संतोष सैद व अनिल सैद यांनी सांगितले. ४४ विद्यार्थी व पाच कर्मचारी सुरक्षित असल्याचा निर्वाळा प्रशासन व शाळा व्यवस्थापने दिला आहे. या अपघातात कोणीही दगावले नसल्याचे संस्थेचे अध्यक्ष अजित काळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT