Pimpri Chinchwad Accident news update esakal
पुणे

School Bus Accident: आलिशान गाड्यांच्या चालकांना आवरा! आता पिंपरी चिंचवडमध्ये शाळेच्या बसला धडक, विद्यार्थी जखमी

Pimpri Chinchwad Accident: अपघाताच्या वेळी विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आणि ते घाबरले. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहोचून बचावकार्य सुरू केले.

Sandip Kapde

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील सायन्स पार्कजवळ पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या बस आणि एका आलिशान गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात स्कूल बसमध्ये असलेल्या दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत.

समोरासमोर जोरदार धडक

दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कूल बस बीआरटी लेनमध्ये जात असताना एक आलिशान गाडी भरधाव वेगात आली आणि स्कूल बसला समोरासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात स्कूल बसमध्ये असलेल्या दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत.

रुग्णालयात उपचार सुरू-

जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पिंपरी पोलिसांनी सांगितले की, पोदार इंटरनॅशनल स्कूलची ही बस पंधरा विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. अपघाताच्या वेळी विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आणि ते घाबरले. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहोचून बचावकार्य सुरू केले.

अपघाताचा तपास सुरू-

पिंपरी पोलिसांनी या अपघाताचा तपास सुरू केला आहे. गाडीचा चालक आणि बसच्या चालकांची चौकशी सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण काय होते याचा शोध घेतला जात आहे. अशा अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी वेगाने चालणाऱ्या गाड्यांवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT