पुणे

काळाखडक टी-जंक्शनवर स्कूल बसला आग

CD

वाकड, ता. २० : डांगे चौक-हिंजवडी रस्त्यावरील भूमकर चौक, काळाखडक टी-जंक्शन येथे गुरुवारी (ता. २०) सकाळी साडेदहाच्या सुमारास शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या स्कूल बसला अचानक आग लागली. काही क्षणातच बस जळून खाक झाली. या दुर्घटनेवेळी बसमध्ये एकही विद्यार्थी अथवा चालक नसल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
स्कूल बस (वाहन क्रमांक एमएच १४ सीडब्ल्यू ०७७१) ताथवडे येथील विद्यार्थी ने-आण करण्यासाठी वापरली जात होती. सकाळी त्यांना सोडल्यानंतर बस परत येत असताना काळाखडक टी जंक्शन परिसरात अचानक बसच्या डॅशबोर्डमधून धूर येऊ लागला. बसचालक राजू पवार यांनी प्रसंगावधान राखत बस थांबवली. खाली उतरून मेकॅनिकला फोन करत असतानाच आगीने रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच रहाटणी उपअग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली. आग शमविण्यासाठी या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. वाकड पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून चालकाचा जबाब नोंदवला आहे. बसला आग नेमकी कशामुळे लागली ? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळच्या सुमारास भुमकर चौकाकडून डांगे चौकाकडे जायच्या दिशेला ही दुर्घटना घडली. त्यामुळे वाहतुकीचा फार मोठा इश्यू झाला नाही. तरी देखील वाहतुकीला अडथळा होऊ नये याची सर्वतोपरी काळजी घेण्यात आली. बसमधील अंतर्गत बिघाड व वायरिंग मधील शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
- बापू ढेरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: धावत्या लोकलमध्ये आसनावरून वाद, नंतर धक्काबुक्की अन्... ६२ वर्षीय प्रवाशाला ढकललं; उपचारादरम्यान मृत्यू

J&K High Court Bench: लडाखमध्ये जम्मू-काश्मीर हायकोर्टची बेंच स्थापन होणार! केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, नागरिकांना मोठा दिलासा

CSMT Ghee Scandal: धक्कादायक! ‘मानवी सेवनासाठी नाही’ असे तूप मोटरमनच्या ताटात; सीएसएमटीतील ‘साई कटर्स’ कॅन्टीन बंद

Marwade Bypass : मरवडे बायपास मागणी आंदोलनात वाहतूक अडथळा; 35 ग्रामस्थांवर गुन्हे दाखल, सनदशीर आंदोलनाला शिक्षा?

Latest Marathi News Live Update: बालवडकरांनंतर टिंगरेंचाही निधी घेतला काढून, स्थायी समितीत भाजपाच निर्णय

SCROLL FOR NEXT