पुणे

टेमगिरवाडी शाळेचे रंगोत्सव स्पर्धेत यश

CD

चाकण, ता. ६ : महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे आयोजित राज्यस्तरीय रंगोत्सव स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेमगिरवाडी काळुसने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. त्याबद्दल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुण्याचे उपसंचालक अरुण जाधव यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन टेमगिरवाडी शाळेचा गौरव करण्यात आला.
राज्याच्या आठ शिक्षण विभागातून २२ अनुभवात्मक अध्ययन आधारित उत्कृष्ट कृतींचे राज्यस्तरावर एससीईआरटी, पुणे या ठिकाणी कला एकात्मिकता, क्रीडा एकात्मता, खेळावर आधारित अध्यापन शास्त्र या मुद्द्यांच्या आधारे सादरीकरण पार पडले. त्यामध्ये पुणे विभाग, लातूर विभाग व कोल्हापूर विभाग यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. पुणे विभागाचे नेतृत्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेमगिरवाडीने केले. शाळा प्रमुख दीपक रेटवडे, रामकृष्ण वाटेकर व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अनुभवात्मक अध्ययन आधारित सादरीकरणाचा राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल एससीईआरटी, पुण्याचे संचालक राहुल रेखावार, उपसंचालक अरुण जाधव, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, एससीईआरटी सहाय्यक संचालक, बाळकृष्ण वाटेकर गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, शिक्षणविस्तार अधिकारी जीवन कोकणे यांनी अभिनंदन केले.
अनुभवात्मक शिक्षण आधारित अध्ययन अध्यापन उपक्रमाला विस्तार अधिकारी वामन सूर्यवंशी, केंद्रप्रमुख जयश्री गोरे यांनी मार्गदर्शन केले. राज्यस्तरीय शैक्षणिक यशाबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.

10125

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT