पुणे

ग्राम विकास -चला शाळेत जाऊया

CD

----
पान ८ - तातडीने
००००००००००००००००००
‘चला शाळेत जाऊया’ उपक्रमात एकाच दिवशी पाहणी
------
जिल्हा परिषदेचा १०८० शाळांमध्ये विक्रमी शैक्षणिक उपक्रम
------
ॲग्रोवन वृत्तसेवा
धाराशिव : ‘धाराशिव - व्हिजन २०३०’ आणि ‘चला शाळेत जाऊया’ या उपक्रमात मंगळवारी (ता. १५) जिल्ह्यातील एक हजार ८० जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची एकाच दिवशी जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यात दोन्ही उपक्रमांसह सात ते नऊ मोबाइल-टीव्ही बंद, अभ्यास सुरू या उपक्रमाचा आढावा घेऊन भौतिक सुविधांची माहिती संकलन व प्रत्यक्ष पडताळणी केली.
जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागातील शाळांमधील भौतिक सुविधांची सद्यस्थिती जाणून घेऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या विशेष उपक्रम राबविण्यात आला. मोहिमेत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी निलेश काळे, प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भालके, शिक्षणाधिकारी कैलास पिकवणे यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुख, वर्ग-१, वर्ग-२ तसेच वर्ग-३ स्तरावरील क्षेत्रीय अधिकारी सहभागी झाले होते. सर्वांनी विविध तालुक्यांतील जिल्हा परिषद शाळांना भेटी देऊन पाहणी केली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, सरपंच, माजी विद्यार्थी संघ, मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थांशी संवाद साधला. भेटीदरम्यान प्रत्येक शाळेतील उपलब्ध भौतिक सुविधा आणि आवश्यक असलेल्या भौतिक सुविधांची माहिती एका निर्धारित फॉर्मद्वारे संकलित केली. वर्गखोल्या, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वीज, संगणक, डिजिटल सुविधा, क्रीडा साहित्य, फर्निचर आदी विविध बाबींचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला. ज्या सुविधांची कमतरता जाणवते आहे त्याचा प्राधान्य क्रमही भरून घेण्यात आला आहे. मोहिमेत शाळांकडून ‘Eppicollect’ मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे यापूर्वीच गोळा केलेल्या भौतिक सुविधांची माहितीचीही पडताळणी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या संकल्पनेतून शाळांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाणावेळी...; गुजरात दौऱ्यात काय घडलं?

Nashik Land Scam: 'टंकलेखनातील चूक' सांगत ९८ हजार चौ.मी. जमीन गायब? पीटीसीसमोरील ६२ एकर जमीन प्रकरणात जिल्हा प्रशासनाचा खंडपीठात अहवाल

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणी संजय राऊतांचा मोठा दावा, भाजपवर थेट इशारा

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात गणेशोत्सवातील देखाव्यातून विरोध; राजू शेट्टी, सतेज पाटील, जयंत पाटलांना भावनिक साद

Devendra Fadnavis: पिके करपली, दुष्काळाचे संकट गडद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एनडीआरएफची वाट पाहणार नाही, आधीच शेतकऱ्यांना मदत देणार

SCROLL FOR NEXT