पुणे

परसबागेतील भाज्यांचा विद्यार्थ्यांकडून आस्वाद

CD

आळेफाटा, ता. ५ : वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील प्राथमिक शाळेत अनोखा उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या परसबागेत पिकविलेल्या अळू, कोबी आणि कोथिंबिरीपासून बनविलेल्या स्वादिष्ट भाजीचा विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना ताज्या भाज्यांचे महत्त्व, त्यातील पोषणमूल्ये, संतुलित आहार, स्वच्छता आणि स्वावलंबन यांची माहिती मिळाली. तसेच शेतीविषयी आवड निर्माण होण्याबरोबरच निसर्गप्रेम आणि श्रमप्रतिष्ठेचे संस्कार रुजण्यास मदत झाली. पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देण्याचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरला.
विद्यार्थ्यांनी परसबागेतून भाज्या काढणे, त्यांची स्वच्छता करणे, भजी तयार करण्यासाठी आवश्यक साहित्याची तयारी करणे अशा विविध कामांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्वतः परसबागेत पिकविलेल्या भाज्यांपासून तयार केलेल्या भाजीचा आस्वाद घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावर, गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे, विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे, केंद्र प्रमुख शंकर सोनवणे, कृषी विभागाचे अधिकारी नीलेश बुधवंत, भाग्यश्री कृषी भंडारचे शंकर गडगे आणि उद्योजक अविनाश आढाव यांचे विशेष सहकार्य मिळाले.
शाळेचे मार्गदर्शक डी. बी. नाना वाळुंज, मुख्याध्यापक सुनील ठिकेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रेय चौगुले पाटील, सहशिक्षिका छाया डुंबरे, सुनंदा तांबे, गीता बोराडे, सविता खेत्री यांनी उपक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

09058

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought Relief: पाच हजारांची मदत ७३ लाख शेतकऱ्यांना;फडणवीस : उर्वरितांना दोन दिवसांत रक्कम मिळणार

Satara Farmer Loan Waiver: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ, चौथी यादी जाहीर

Navi Mumbai: माजी मंत्र्याचा अनधिकृत कारभार? मोरबे धरण क्षेत्रात अलिशान फार्म हाऊसची उभारणी, नवा वाद पेटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : गोकुळच्या राजकारणात माजी सरन्यायाधीशांच्याही मताचा उल्लेख

IPL 2027 Trade: चेन्नई सुपर किंग्सने हार्दिक पांड्याला 'ठेंगा' दाखवला; SRH चे दोन तगडे खेळाडू आपल्या संघात घेतले, त्याबदल्यात कोणाला दिले?

SCROLL FOR NEXT