पुणे

शालेय पोषण आहारातील वाटाण्याचा घोळ; सोलापुरात हिरवा की पांढरा

CD

हिरवा अन्‌ पांढरा वाटाणा दरात किलोमागे १०० रुपये तफावत
४.९० लाख किलो वाटाण्याचे ६.५५ कोटींचे बिल थकीत; मक्तेदारावर कारवाई शून्य

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ६ : विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारातील वाटाण्याच्या पुरवठ्यावरून राज्यभरात सावळा गोंधळ आहे. सोलापूर जिल्ह्यातील मक्तेदाराला नेमका कोणता वाटाणा पुरवण्याचा मक्ता देण्यात आला, याची चर्चा आहे. निविदेतील अटींमध्ये हिरवा वाटाणा नमूद असताना प्रत्यक्षात पांढरा अथवा साधा वाटाणा पुरवल्याने मक्तेदाराचे ६ कोटी ५५ लाख रुपये बिल अदा केले नाही. हिरवा वाटाणा १३० रुपये प्रतिकिलो, तर पांढरा वाटाणा ३० ते ४० रुपये प्रतिकिलो असा दर आहे. प्रतिकिलो ९० ते १०० रुपयांचा नफा मक्तेदाराचा की आणखी कोणाचा? याची चौकशी करणे गरजेचे आहे. यामध्ये मक्तेदारास फक्त कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गटशिक्षणाधिकारी व संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी पांढरा वाटाणा स्वीकारलाच कसा? यावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील शाळांना वाटप करण्यात आलेल्या वाटाण्याचा प्रकार, त्याचा दर्जा, खरेदीचा दर आणि मक्तेदाराला देण्यात आलेल्या कार्यादेशातील अटी यांची पडताळणी होणे आवश्यक आहे. निविदेत हिरवा वाटाणा असताना कार्यादेशात केवळ ‘वाटाणा’ असा उल्लेख करून पुरवठ्याला मुभा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पुरवठादाराकडून साहित्य तपासून घेणे ही गटशिक्षणाधिकारी व मुख्याध्यापक यांची जबाबदारी असताना त्यांनी कोणतीही तपासणी केली की नाही, याची चौकशी होणे गरजेचे आहे. शाळांच्या नोंदवहीत प्राप्त झालेला माल, पुरवठादाराची चलने, वजनाच्या नोंदी, वितरण पावत्या आणि प्रत्यक्ष साठा यांचा ताळमेळ तपासल्यास नेमका कोणता व किती वाटाणा पुरवण्यात आला, याचे चित्र स्पष्ट होऊ शकते.

जिल्हानिहाय मागवली माहिती...
राज्यातील शालेय पोषण आहार योजनेत हिरव्या वाटाण्याऐवजी साधा वाटाणा पुरविल्याच्या तक्रारीनंतर शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीला जुलै २०२६ मध्ये आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. तसेच जिल्हानिहाय पुरवठादारांकडून वाटाण्याचे झालेले वितरण, शाळांमधील शिल्लक साठा आणि प्रत्यक्ष वाटपाची माहिती मागविण्यात आली आहे.

कोट...
जिल्ह्यातील निविदा, कार्यादेश, पुरवठ्याची बिले आणि शाळांना झालेले प्रत्यक्ष वाटप याची तपासणी करावी. बाजारात हिरवा वाटाणा १३० रुपये किलो, तर पांढरा वाटाणा ३० ते ४० रुपये किलो असा दर आहे. पांढरा वाटाणा पुरवठा करून बिले मात्र हिरव्या वाटाण्याची दिली आहेत. यामुळे किलो ९० ते १०० रुपयांचा नफा मक्तेदाराचा की आणखी कोणाचा, याची चौकशी करणे गरजेचे आहे. याबाबत स्थायी समितीमध्ये चौकशीची मागणी केली आहे.
- दादासाहेब लवटे, सदस्य, जिल्हा परिषद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : पुण्यात उद्या MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चा

SCROLL FOR NEXT