School Nutrition Food Scheme sakal
पुणे

शालेय पोषण आहार योजना आता ‘पीएम-पोषण’ नावाने ओळखली जाणार

केंद्र सरकारने शालेय पोषण आहार योजनेचे नामकरण ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण’ (पीएम-पोषण) असे केल्यामुळे आता राज्यातही शालेय पोषण आहार ही योजना आता नवीन नावानेच ओळखली जाणार.

मीनाक्षी गुरव -GMinakshi_Sakal

केंद्र सरकारने शालेय पोषण आहार योजनेचे नामकरण ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण’ (पीएम-पोषण) असे केल्यामुळे आता राज्यातही शालेय पोषण आहार ही योजना आता नवीन नावानेच ओळखली जाणार.

पुणे - केंद्र सरकारने शालेय पोषण आहार योजनेचे नामकरण ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण’ (पीएम-पोषण) असे केल्यामुळे आता राज्यातही शालेय पोषण आहार ही योजना आता नवीन नावानेच ओळखली जाणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नुकताच निर्णय घेतला आहे.

प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीने तसेच प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची पट नोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याकरिता केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना १५ ऑगस्ट १९९५ पासून राज्यात सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारने या योजनेचे नामकरण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (पीएम- पोषण) असे केले आहे. या योजनेच्या २०२१-२२ ते २०२५-२६ या पंचवार्षिक आराखड्यास मान्यता दिल्याचे ६ ऑक्टोबर २०२१ रोजी मार्गदर्शक सूचनांद्वारे कळविले आहे. त्यानुसार या योजनेच्या नावात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच, केंद्र सरकारने प्रस्तुत योजनेकरिता दिलेल्या मार्गदर्शक सूचना व इतर बाबी केंद्र शासनाच्या ऑक्टोबर २०२१मधील पत्राप्रमाणे करण्यात येतील, असे शालेय शिक्षण विभागाचे सह सचिव झ. मु. काझी यांनी अध्यादेशाद्वारे स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलांनो! राजकारणात पडू नका; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी व्यथित माजी मंत्र्याची 'शेवटची चिट्ठी', कार्यालयात आढळला मृतदेह

Congress Leader Murder : काँग्रेस नेत्याची मुलासह निर्घृणपणे हत्या ! कारला घेरलं, गोळ्या झाडल्या अन् धारदार शस्त्रांनी बाप-लेकाला संपवलं

Marathi News Live Updates : ड्रग्स तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी विरेंदर बसोया न्यायालयात हजर

तू कोणाचातरी मर्डर करायला हवा होतास... अंकुर वाढवेला मित्राने सांगितलेलं असं काही; जेवायला बोलावलं आणि...

LPG Cylinder Booking: आजपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही एलपीजी सिलिंडर;ताबडतोब करा 'हे' काम

SCROLL FOR NEXT