Mhalasakant-school-Road 
पुणे

शाळा सुटली, कोंडी नाही फुटली

शिवाजी आतकरी

निगडी - शाळा-महाविद्यालय भरताना आणि सुटताना परिसरात होणारी तुडुंब गर्दी, वाहतूक व्यवस्थेचा आणि शिस्तीचा उडालेल्या बोजवारा यामुळे विद्यार्थी व पालकांचा जीव टांगणीला लागतो. पोलिस व शाळा प्रशासनाचे त्याकडे होणारे दुर्लक्ष पाहता मोठा अपघात होण्याची शक्‍यता आहे.

म्हाळसाकांत विद्यालय परिसरातील हे चित्र यासाठी पुरेसे बोलके आणि शहरातील शाळा परिसराचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. कमी, अधिक फरकाने सर्वत्र अशीच परिस्थिती आहे. रस्त्याच्याकडे दुतर्फा होणारे पार्किंग वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहे. भरधाव व कर्णकर्कश हॉर्न वाजवत धावणारी वाहने रस्ता ओलांडणाऱ्या विद्यार्थी, पालकांच्या मनात भीती निर्माण करतात.

विद्यार्थ्यांनी भरलेली रिक्षा, दुचाकीवर चार-चार विद्यार्थी घेऊन जाणारे पालक, हे धोकादायक चित्र दिसत असून, त्यामुळे अपघाताचा धोका आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी शाळा किंवा वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न होत नाहीत.

आकुर्डीतील म्हाळसाकांत विद्यालय परिसरातील पदपथ टपऱ्यांनी व्यापले आहेत; तसेच पार्किंगमुळे पदपथावरून चालताही येत नाही. रस्ता ओलांडून जाणे जिकिरीचे असते. प्रशासन ढिम्म आहे.

पदपथावरून चालणे आणि रस्ता ओलांडणे अवघड होऊन जाते. वाहनचालक आणि टपोरी पोरांची परिस्थिती नेहमी आढळते.
- माधवी शिंदे, पालक

इतर शाळांचीही गर्दी, पार्किंग यामुळे या परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. काही स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन वाहतूक नियंत्रणात आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी पोलिसांचेही सहकार्य मिळणार आहे. 
- ए. एम. शेख, प्राचार्य, म्हाळसाकांत विद्यालय, आकुर्डी

हॉर्न, गोंधळ, वाहनचालकांची बेशिस्ती त्यामुळे पाल्यास सोडायला जावेच लागते. विद्यालयाच्या बाहेर रहदारीमुळे असुरक्षित परिस्थिती असते.
- रविकिरण राठोड, पालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike : दूध महागणार! १ सप्टेंबरपासून प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ; नवा दर किती?

Devdutta Padikkal Tattoo: बाबो! जर्सीचा नंबर अन् नाव थेट पाठीवर! पडिक्कलच्या टॅटू पाहून चाहतेही चक्रावले, म्हणाले, ‘ अरे हे काय!’

Animal Feed Poisoning: पशुखाद्यातून विषबाधा; गोणेवाडीत दोन जनावरे दगावली, दोन गंभीर; पशुपालकाला मोठा आर्थिक फटका

Marathi News Live Updates : RSS पथसंचलनात सहभागी झाल्याने दोन शिक्षक निलंबित; एच. डी. कुमारस्वामींचा सरकारला सवाल

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात माणुसकीला लाज आणणारी घटना! मृत महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने चोरले; VIDEO VIRAL होताच संतापाची लाट

SCROLL FOR NEXT