पुणे

शालेय मैदानी स्पर्धा

CD

अभिषेक, अदिती, आर्शियाला दुहेरी मुकुटाचा मान
शालेय मैदानी स्पर्धा

पुणे, ता. ८ ः शिक्षण विभाग (पुणे मनपा) आणि जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्यातर्फे आयोजित शालेय मैदानी स्पर्धेत अभिषेक गुळभिले, अदिती हरगुडे, आर्शिया पवारने दुहेरी मुकुटाचा मान मिळविला.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू झालेल्या या स्पर्धेत वाघोलीतील भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) अदिती हरगुडेने सतरा वर्षांखालील मुलींच्या १५०० (पाच मिनिटे व १८.६ सेकंद) आणि ३००० मीटर धावण्याच्या (११ मिनिटे व ५५.०६ सेकंद) शर्यतीत बाजी मारली. यांत ‘बीजेएस’च्याच अक्षता धुमाळने दुसरा, तर ‘पीआयसीटी’च्या दर्शिता बोगावतने तिसरा क्रमांक मिळवला. १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीतही या तिघींनीच पहिले तीन क्रमांक मिळवले.
एकोणीस वर्षांखालील मुलींच्या गटात स. प. महाविद्यालयाच्या आर्शिया पवारने १५०० (पाच मिनिटे व ३०.२ सेकंद) आणि ३००० मीटर (१२ मिनिटे व २५.८ सेकंद) धावण्याच्या शर्यतीत बाजी मारली. ३००० मीटर धावण्याच्या शर्यतीत स.प. कॉलेजच्या अदिती घुगेने दुसरा व ‘बीजेएस’च्या अदिती भडने तिसरा क्रमांक मिळवला, तर १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अदिती भडने दुसरा, तर बाल शिक्षण मंदिरच्या अर्वा स्वामीने तिसरा क्रमांक मिळवला.
श्री शाहू मंदिर कॉलेजच्या अभिषेक गुळभिलेने १५०० (चार मिनिटे व ११.९ सेकंद) आणि ३००० मीटर धावण्याची (नऊ मिनिटे व ११ सेकंद) शर्यत जिंकली. यांत स.प. कॉलेजच्या अभिनवसिंहने दुसरा, तर ‘विद्यावर्धिनी’च्या प्रथमेश भोसलेने तिसरा क्रमांक मिळवला. पंधराशे मीटर शर्यतीत अवनीश मुळेने दुसरा आणि प्रथमेश भोसलेने तिसरा क्रमांक मिळविला.
या स्पर्धेतील चौदा वर्षांखालील मुलींमध्ये आर्यन वर्ल्ड स्कूलची तेजल लिगाडे ‘वेगवान धावपटू’ तेजलने लिगाडेने शंभर मीटर धावण्याची शर्यत १३.४ सेकंद वेळेत नोंदवून जिंकली. ‘अभिनव’च्या बतुल रेतीवालाने दुसरा, तर आर्मी पब्लिक स्कूलच्या ओवी काळेने तिसरा क्रमांक मिळवला.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar Earthquake : पालघरला भूकंप,३.७ रिश्टर स्केलचा धक्का; तलासरी तालुक्यातील कुर्झे केंद्रबिंदू, सात किलोमीटर खोलीवर भूकंपाची नोंद

IMD Rain Alert : मोठी बातमी! माॅन्सूनच्या एक्झिट दरम्यान 22 राज्यांत मुसळधार पावसासह वादळाचा अलर्ट; 70 किमी स्पीडने वाहणार वारे, महाराष्ट्रात कशी स्थिती?

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्र्यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले

Pocso News : फेसबुकवरील मैत्री पडली महागात ! हॉटेलमध्ये बोलावून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नानांच्या अखेरच्या प्रवासात पत्नी-मुलाची अवस्था पाहून डोळे पाणावतील; नीलकांती आणि मल्हार यांचा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT