Student 
पुणे

चला, बालशास्त्रज्ञ होऊयात !

सकाळवृत्तसेवा

पुणे - शालेय विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, तौलनिक विचारक्षमता, निर्णयक्षमता, निरीक्षण कौशल्य व कृतिशीलता वाढीस लागावी आणि वैज्ञानिक प्रयोगातून नवनिर्मितीचा आनंद मिळावा म्हणून होणारा ‘संडे सायन्स स्कूल’ उपक्रम पुणे आणि पिंपरी-चिंचवड-निगडीमध्ये रविवार (ता. २२) पासून सुरू होत आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘संडे सायन्स स्कूल’ यांनी हा उपक्रम आयोजिला आहे.

दर रविवारी दोन तासांमध्ये विज्ञान विषयातील विविध संकल्पना समजून घेऊन त्यावर आधारित प्रयोग किंवा सायन्स मॉडेल प्रत्येक विद्यार्थी स्वत: हाताने बनवतात. तयार केलेले मॉडेल विद्यार्थ्यांना घरी नेता येते, ज्यातून त्यांची घरातली प्रयोगशाळा तयार होते. या विशेष उपक्रमात विद्यार्थी एप्रिल ते डिसेंबर २०१८ दरम्यानच्या २३ रविवारी एकत्र जमून स्वहस्ते प्रयोग करीत विज्ञान शिकणार आहेत. तिसरी व चौथीच्या वर्गातील मुले या कालावधीत सुमारे ४० प्रयोग व प्रकल्प तयार करतील. हवा, संतुलन, सूर्यमाला, प्रकाश, चुंबकत्व, ध्वनी, बल, स्वयंपाक घरातील विज्ञान आदी संकल्पनावरील प्रयोग व फिल्म प्रोजेक्‍टर, पेरिस्कोप, सूर्यमाला यांसारखे प्रकल्प तयार करतील.

पाचवी आणि सहावीच्या वर्गातील मुलांसाठी विशेष प्रात्यक्षिक अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या तयारीसाठी याचा उपयोग होईल.

सातवी ते नववीमधील विद्यार्थी या उपक्रमात सोलर कार, हायड्रो इलेक्‍ट्रिसिटी मोडेल, हायड्रॉलिक आर्म, मायक्रोस्कोप, आर्किमिडीसचे तत्त्व, इलेक्‍ट्रिसिटी व रसायनशास्त्रातील विविध प्रयोग, हवामान वेधशाळा तयार करणे असे प्रयोग करतील.यासोबतच वैज्ञानिक संकल्पनांचे सादरीकरण, प्रयोगांचे प्रदर्शन, विविध विज्ञान स्पर्धा वर्षभरात आयोजित केल्या जातात व विद्यार्थ्यांना शेवटी प्रमाणपत्र वितरित केले जाते. दरम्यान, आतापर्यंत २० हजारांहून अधिक मुलांनी घरीच त्यांची प्रयोगशाळा बनविली आहे.

सर्व साहित्यांसह शुल्क
3 री व 4 थी साठी   - 4800 रुपये
5 वी व 6वी साठी  - 5600 रुपये
7 वी ते 8वी साठी  - 6800 रुपये

 शुल्क दोन धनादेशांद्वारे किंवा रोखीने भरता येईल
 अधिक माहितीसाठी संपर्क ः ९८५००४७९३३ किंवा ९३७३०३५३६९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pimpri Chinchwad News: धार्मिकतेच्या नावे भूखंड हडपण्याचे उद्योग; पिंपरी चिंचवडमधील कारभाऱ्यांचे कारनामे, अनेक ठिकाणी अतिक्रमणे!

Ahilyanagar Crime: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष; विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबाला १० वर्षांची शिक्षा,न्यायालयाचा निर्णय..

'कमळी' आणि 'सनई चौघडे' मालिकांचा महासंगम! जय, शर्वरी, ऋषी आणि कमळीचा निर्णय पडणार का त्यांच्यावरच भारी?

Latest Marathi News Live Update : अमरावतीत उष्णतेचा कहर; आजही तापमान 46 अंशांच्या पार जाण्याची शक्यता

Pune Petrol Diesel Rate Hike: वाहनधारकांची चिंता वाढली; चार दिवसांत दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल दरवाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला फटका..

SCROLL FOR NEXT