school students sakal media
पुणे

पहिली ते चौथीची शाळा भरविण्यासाठी शाळा उत्सुक

गेल्यावर्षी इयत्ता पहिलीमध्ये असणारे विद्यार्थी आता थेट इयत्ता दुसरीत गेले आहेत. परंतु त्यांनी अद्याप शाळाच पाहिलेली नाही.

मीनाक्षी गुरव

पुणे - गेल्यावर्षी इयत्ता पहिलीमध्ये असणारे विद्यार्थी आता थेट इयत्ता दुसरीत गेले आहेत. परंतु त्यांनी अद्याप शाळाच पाहिलेली नाही. अभ्यासक्रमातील मूळ संकल्पना स्पष्ट होण्याच्या या वयात विद्यार्थ्यांची शैक्षणिक कोंडी वाढत आहे, असे असताना इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग तातडीने सुरू करण्याची गरज आहे. त्यामुळे दिवाळीनंतर हे वर्ग सुरू करण्यासाठी शिक्षक आणि पालक तयारी आहेत, असे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतीच राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीदरम्यान दिवाळीनंतर इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याबाबत सकारात्मकता असल्याचे चित्र समोर आले. शालेय शिक्षण विभागही याबाबत विचारविनियम करत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापकांशी संवाद साधला असता, त्यांनी हे वर्ग सुरू करण्यास तयार असल्याचे सांगितले.

‘गेल्या दीड वर्षात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. अनेक विद्यार्थी शाळाबाह्य झाली आहेत. या वर्गात असणाऱ्या मुलांमध्ये अभ्यासक्रमातील संकल्पना स्पष्ट होत असतात. त्याशिवाय लिहायची आणि वाचायची सवय लागत असते. परंतु हे सर्व कोरोना काळात दुरावले आहे. त्यामुळे या शाळा सुरू होणे गरजेचे आहे,’’ असे मत पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड यांनी मांडले.

तर खराडी येथील सुंदरबाई मराठे विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय सोमवंशी म्हणाले, ‘‘शालेय शिक्षण विभाग इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याबाबत विचारविनिमय करते ही बाब स्वागतार्ह आहे. या वर्गातील मुलांच्या शाळा सुरू व्हाव्यात, याबाबत शिक्षक आणि पालक आग्रही आहेत. या वयोगटातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरू होणे गरजेचे आहे.’’ सध्या शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत. दिवाळीनंतर शहरी भागात पाचवी ते सहावीचे वर्ग, तसेच पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याला परवानगी मिळावी, अशीही मुख्याध्यापकांची मागणी आहे.

कोरोना काळात इयत्ता पहिली ते चौथी या वर्गातील विद्यार्थ्यांवर झालेला परिणाम :

१. गेल्यावर्षी पहिलीमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांनी अद्याप शाळेची पायरी चढलेली नाही

२. प्रत्यक्ष शाळा भरत नसल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष

३. स्मरणशक्ती आणि पाठांतर होतंय कमी

४. अक्षर आणि अंक ओळख न होणे

५. लिखाण अशुद्ध होणे

६. लिखाण, वाचन होतंय कमी

७. मूलभूत ज्ञानापासून दुरावले विद्यार्थी

पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय लवकर घ्यावा

‘इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गात असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वयोगटाला कोरोनाचा धोका कमी असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे. तसेच सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हे वर्ग सुरू करण्याला सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागानेही दिवाळीनंतर पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय लवकर घ्यावा.’

- महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ता, मुख्याध्यापक महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा मुसळधार! 'या'१२ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी, हवामानाचा विभागाचा अंदाज

Suraj Sakhare Firing in Kolhapur : डोळ्यांदेखत गोळीबार पाहून बोबडीच वळली; टायर फुटल्यासारखा मोठा आवाज अन्..; प्रत्यक्षदर्शी कामगाराने सांगितला घटनेचा थरार

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! मगरपट्ट्याचा उड्डाण पूल पाडणार; भैरोबानाला-हडपसर ते यवत ३६.५ किमी उड्डाण पूल हाेणार, मेट्रो विस्तारालाही गती

Maharashtra Land: राज्य सरकारचा मोठा निर्णय! वर्ग-२ जमिनी थेट वर्ग-१ मध्ये; लाखो भूखंडधारकांना मालकी हक्काचा मार्ग मोकळा

Matar Khasta Kachori: मैद्याची कुरकुरीत कचौरी अन् चिंच-गुळाची चटणी; जाणून घ्या बाराबंकीच्या प्रसिद्ध 'मटर खस्ता'ची सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT