पुणे

शाळा कधी भरणार हे अनिश्चित; पण पुस्तके पोहचली शाळेत

संतोष आटोळे

शिर्सुफळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा कधी भरणार हे जरी अनिश्चित असले तरी प्रशासनाने मात्र पाठ्यपुस्तके शाळांपर्यत पोहच केली आहेत. ज्यावेळी शासन निर्णय तेव्हा शाळा सुरु होतील. यापूर्वी प्रशासनाने तयारी केली आहे.

'सारे शिकूया पुढे जाऊया' असे म्हणत सुरू केलेल्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील 13 तालुक्यातील पहिले ते आठवीच्या शाळांमधील 4 लाख 58 हजार 349 विद्यार्थ्यांना यंदा मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

जिल्हा कार्यालयातुन तालुकास्तरावरील गट शिक्षणाधिकारी कार्यालयात पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे.तेथुन शाळास्तरावर पुस्तके वितरीत करण्यात येत आहेत.या माध्यमातुन सर्व विद्यार्थ्यांना शासन आदेश होताच शाळेच्या पहिल्या दिवशीच पुस्तके देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गेल्या तीन वर्षापासून एका शासकीय निर्णयानुसार पाठ्यपुस्तकांचे थेट वितरण न करता पाठ्यपुस्तकांची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याचे नियोजन होते. मात्र, यंदाही निर्धारित कालावधीत सर्वच विद्यार्थ्यांचे बँक खाते उपलब्ध होऊ शकले नाही. यामुळे थेट लाभ योजनेतून यंदाही पाठ्यपुस्तक योजनेला वगळले व पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्याचा निर्णय घेतला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

या दृष्टीने शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावेत, यासाठी शिक्षण विभागाच्या मार्फत शाळांनी युडाईसवर भरलेल्या माहितीनुसार लाभार्थी विद्यार्थ्यी संख्या निश्चित करण्यात आली. त्यानुसार 2020-21 या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यात 4 लाख 58 हजार 349 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. यामध्ये मराठी माध्यमाच्या 4 लाख 38 हजार 743, हिंदी माध्यमाच्या 1 हजार 650, इंग्रजी माध्यमाच्या 12 हजार 919 व उर्दू माध्यमाच्या 4 हजार 579, तमिळ माध्यमाच्या 103 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या नियोजनानुसार जिल्हास्तरावरुन प्रत्येक तालुक्यात इयत्ता पहिली ते आठवीची पुस्तके तालुकास्तरावर उपलब्ध करून दिली आहेत. त्यानंतर मुख्याध्यापक पुस्तके शाळांमध्ये घेऊन जात आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोणत्याही परिस्थितीत शासनाने शाळा सुरु करण्यासंर्दभात आदेश देताच शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे. तर सर्व माध्यमातुन मिळुन  जिल्ह्यात पहिलीसाठी 54 हजार 230, दुसरीसाठी 54 हजार 303, तिसरीसाठी 54 हजार 338, चौथीसाठी 54 हजार 180, पाचवीसाठी 57 हजार 521, सहावीसाठी 58 हजार 149, सातवीसाठी 63 हजार 012, आठवीसाठी 62 हजार 616 पुस्तके पाठविण्यात आली आहेत.

शासन आदेश होताच शाळा सुरु

जिल्ह्यातील सर्व शाळांपर्यत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली आहेत. शासनाकडून शाळा सुरु करण्याबाबतचा आदेश येताच विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके उपलब्ध व्हावी, या दृष्टीने शिक्षण विभागाने नियोजन केले आहे.

- सुनिल कुऱ्हाडे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, पुणे 

जिल्ह्यात मोफत पुस्तके पात्र विद्यार्थी संख्या खालीलप्रमाणे...

1) आंबेगाव - 18948
2) खेड - 49234
3) जुन्नर - 36301
4) मावळ - 35884

5) मुळशी - 20743
6) भोर - 16208
7) वेल्हे - 4326
8) शिरूर - 47846
9) हवेली - 77827
10) पुरंदर - 22725

11) दौंड - 40118
12) इंदापुर - 43794
13) बारामती 41639

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore Solapur : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचा ‘प्लॅन’ ठरला? जयकुमार गोरे काय म्हणाले?

'खीर बनवणाऱ्यालाच आधी चाखावी लागते!' ‘सूर्यवंशम’चा उल्लेख करत गौरव कपूरने बिग बींची घेतली फिरकी, Viral Video

Tata Sons N Chandrasekaran : टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून वाद; चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्टचा विरोध

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

SCROLL FOR NEXT