Vikram-Kumar 
पुणे

Breaking News : पुण्यातील शाळा 4 जानेवारीपासून सुरू होणार

सकाळवृत्तसेवा

नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याला महापालिका आयुक्तांची परवानगी 
पुणे - राज्यातील जवळपास 70 टक्के शाळांमधील नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असतानाच आता पुण्यातील शाळा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे. पुणे महापालिका क्षेत्रामधील सर्व शाळांमधील नववी ते बारावीचे वर्ग 4 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गुरुवारी जाहीर केले. 

राज्यातील शाळांमधील नववी ते बारावीचे वर्ग 23 नोव्हेंबरला सुरू करण्यात आले आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा सुरवातीला 13 डिसेंबरपर्यंत बंद राहतील, असे महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते. त्यानंतर पुन्हा तीन जानेवारी 2021 पर्यंत शाळा बंद राहतील, असा आदेश महापालिकेने 12 डिसेंबरला काढला होता. आता महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांमधील नववी ते बारावीचे वर्ग 4 जानेवारीपासून सुरू करण्याला परवानगी दिल्याचे आदेश विक्रम कुमार यांनी काढले आहेत. शाळा सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल, असेही त्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना
- शाळेची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करणे. 
- थर्मल स्कॅनर, ऑक्‍सीमीटर, जंतुनाशक अशा आवश्‍यक वस्तूंची उपलब्धता असेल याबाबत शाळा प्रशासनाने दक्षता घ्यावी. 
- शाळा वाहतूक सुविधांचे नियमित निर्जंतुकीकरण आणि त्याची शाळा व्यवस्थापनामार्फत पडताळणी आवश्‍यक. 
- सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची "कोविड-19'साठीची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक. 
- वर्गखोली तसेच स्टाफरूममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमानुसार असावी. 
- वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था करावी. 
- शाळेच्या दर्शनी भागावर शारीरिक अंतर, मास्कचा वापर याबाबत मार्गदर्शक सूचना असाव्यात. 
- विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी पालकांची लेखी सहमती शाळा प्रमुखांना किंवा पर्यवेक्षकांना सादर करावी.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar यांची समजूत काढण्याचा प्रयत्न! ऑपरेशन टायगर फेल करण्यासाठी उद्धव ठाकरेंची रात्रीत एक मोठी चाल

Bulandshahr Kachori : चव अशी की विसरणार नाही! सकाळच्या नाश्त्यातली ही कचोरी आता पोहोचली परदेशात; बुलंदशहरची भन्नाट कहाणी

Pune Railway: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! तीन विशेष रेल्वे गाड्या नियमित; तिकीट दर होणार निम्मे, नेमकं कस आहे वेळाकपत्रक..

आजचे राशिभविष्य - 21 जून 2026

IND A vs SL A: त्याच्यासाठी चॅलेंज असणारच... वैभव सूर्यवंशीच्या फॉर्मवर फायनल सामन्यापूर्वी तिलक वर्मा नेमकं काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT