पुणे

आनंदनगरच्या डॅफोडिल्स शाळेतील विज्ञान प्रदर्शनामध्ये १६० प्रकल्प

CD

वालचंदनगर, ता. १ ः आनंदनगर (ता. इंदापूर) येथील डॅफोडिल्स इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनामध्ये ४५० विद्यार्थ्यांनी १६० प्रकल्प सादर केले. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून हे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी गट तयार करुन प्रकल्प सादरीकरण केले. यामध्ये अणुऊर्जा प्रकल्प, मिशन सिंदूर, आधुनिक शेती, कचरा व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, ऊर्जेच्या विविध स्त्रोतावर प्रकल्प, सौर ऊर्जेचा दैनंदिन जीवनातील वापरातील प्रकल्प, तापमान वाढीसंबंधीचा प्रकल्प, पर्यावरण संवर्धन प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग, क्षेपणास्त्राचे प्रकल्प सादर केले होते. या प्रदर्शनाला पालक व परिसरातील नागरिकांनी भेट दिली. या प्रदर्शनाचे उद्‍घाटन वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या हस्ते करण्यात आले. विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळेच्या संस्थापिका तेजस्विनी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या प्राचार्य मंजिरी बुचके, प्रसन्ना कुलकर्णी व शिक्षकांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI : 'करो वा मरो' सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI ठरली! वेस्ट इंडिजविरुद्ध कोणत्या ११ खेळाडूंसह उतरणार?

Iran War: खामेनेई कुठे लपलेत हे कसं कळलं? अमेरिका आणि इस्रायलने नियोजित वेळेपूर्वी हल्ला का केला? आतली माहिती आली समोर!

ड्रग्स प्रकरणात अडकली, संन्यासी होण्याची हौस फिटली ! 25 वर्षांनी अभिनेत्रीचा टीव्हीवर कमबॅक

IND vs WI: टर्निंग पॉईंट! द. आफ्रिकेला दुसऱ्या स्थानावर ढकलण्याची भारताला संधी; इंग्लंडला टाळायचे असेल तर समजून घ्या गणित

Holi 2026 Song: 45 वर्षांनंतरही कायम हिट! होळीच्या या गाण्यात दिसली होती अमिताभ-रेखा यांची भन्नाट केमिस्ट्री

SCROLL FOR NEXT