पुणे

मुख्य अंक, विज्ञान, अध्यात्माची सांगड घालूनच सर्वोदयाचा मार्ग शक्य

CD

Associated Mसedia Ids : VHD26A01238

विज्ञान, अध्यात्माची सांगड
घालूनच सर्वोदय शक्य

डॉ. सुदर्शन अय्यंगार : पवनारच्या ब्रह्मविद्या मंदिरात मित्रमिलन सोहळा

पवनार (जि वर्धा), ता.१५ : ‘‘विज्ञान हे मानवी विकासाचा मार्ग शोधते, तर अध्यात्म माणसाला मानवतेच्या मूल्यांची जाणीव करून देते. त्यामुळे विज्ञानाला अध्यात्माची आणि अध्यात्माला वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड मिळाली, तरच मानवकल्याणाचा व्यापक विचार प्रत्यक्षात उतरू शकतो,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत तथा गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी केले.

पवनार येथील ब्रह्मविद्या मंदिरात रविवारी (ता. १५) आयोजित मित्रमिलन सोहळ्यात ते बाेलत होते. यावेळी ब्रह्मविद्या मंदिरचे ज्येष्ठ गांधीवादी-विनोबा विचारक गौतम बजाज, आश्रमाच्या भगिनी ज्योती बहन, डॉ. उल्हास जाजू, डॉ. पुष्पेंद्र दुबे, डॉ. पराग चोलकर, डॉ. शंकर सान्याल, ज्येष्ठ सर्वोदय कार्यकर्ते रमेशभाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘बदलत्या जगात माणसाचे विचार, आचार आणि व्यवहारही बदलत आहेत. मात्र, या बदलत्या परिस्थितीत माणसाने केवळ ‘माझे, माझे'' असा स्वार्थी दृष्टिकोन न ठेवता त्यागभावनेतून जगण्याची गरज आहे. दुसऱ्याच्या संपत्तीवर हक्क सांगण्याची मानसिकता सोडून परस्परांच्या हक्कांचा आणि अस्तित्वाचा आदर करणे आवश्यक आहे. समाजात खऱ्या अर्थाने सर्वोदयाची भावना रुजवायची असेल, तर व्यक्तीच्या विचारांमध्ये स्वार्थाऐवजी समर्पण आणि सहजीवनाची भूमिका निर्माण झाली पाहिजे,’ असा विचार यावेळी वक्त्यांनी मांडला.
‘अध्यात्म म्हणजे केवळ धार्मिक कर्मकांड नसून प्रत्येक जिवाबद्दल प्रेम, करुणा आणि द्वेषरहित भावना निर्माण करणे होय. सर्व प्राणिमात्रांमध्ये एकच चेतना असल्याची जाणीव माणसाला झाली पाहिजे. संपत्ती, सोने, जमीन आणि इतर संसाधनांवर केवळ वैयक्तिक मालकीचा आग्रह धरण्याऐवजी त्यांचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी कसा करता येईल, याचा विचार होणे आवश्यक आहे. याच विचारातून भूदान आणि ग्रामदानासारख्या संकल्पना पुढे आल्या. अहिंसक समाजाची निर्मिती करायची असेल, तर संपत्तीच्या वापराबाबतही सामाजिक उत्तरदायित्वाची भावना निर्माण करावी लागेल,’ असाही विचार यावेळी वक्त्यांनी मांडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Daily Horoscope : राशिभविष्य - साेमवार १६ नोव्हेंबर २०२६

Share Market: शेअर, म्युच्युअल फंड व्यवहार थेट प्राप्तिकर विवरणपत्रात!

Cheese Butter Toast Recipe: सोमवारच्या धावपळीत झटपट बनवा बटर चीज टोस्ट; अवघ्या १० मिनिटांत तयार होईल कुरकुरीत आणि चविष्ट नाश्ता!

SIP Investment: ‘एसआयपी’ गुंतवणूकदार : पुन्हा एकदा विजेता!

Ration Card Separation: रेशनकार्ड विभक्त केल्यावर धान्य बंद! धान्य सुरू करण्यासाठी 'हा' दाखला बंधनकारक; नवे रेशनकार्ड ३० दिवसांत

SCROLL FOR NEXT