पुणे

संशोधनासाठी जगभरातील शास्त्रज्ञांनी एकत्र यावे - डॉ. जयंत नारळीकर

सकाळवृत्तसेवा

पुणे - ""विश्‍वाचा विस्तार पाहता, आता वैयक्तिकरीत्या संशोधन करणे फार जिकिरीचे झाले आहे. संशोधनासाठी लागणारा वेळ, खर्च, संदर्भाची मांडणी हे पाहता संशोधनासाठी जगभरातील शास्त्रज्ञांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यामुळे संशोधनासाठी लागणारा वेळ, संसाधने आणि पैसा यांची बचत होऊन पर्यायाने संशोधनाचा वेग आणि उपयुक्तता वाढणार आहे,'' असे मत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले. 

आंतरविद्यापीठीय खगोलशास्र आणि खगोलभौतिकी केंद्रात (आयुका) राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित "शास्त्रज्ञांशी संवाद' कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना डॉ. नारळीकर बोलत होते. या वेळी आयुकाचे संचालक डॉ. सोमक रॉयचौधरी उपस्थित होते. 

पृथ्वीचे भविष्य, कृष्णविवराचे रहस्य, लायगो प्रकल्प, मंगळावरील जीवसृष्टी, आकाशाचा रंग अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी डॉ. नारळीकर आणि डॉ. चौधरी यांना कल्पक प्रश्‍न विचारले."ज्योतिषशास्राकडे विज्ञान म्हणून बघावे का?' या प्रश्‍नाचे उत्तर देताना डॉ. नारळीकर म्हणाले, ""विज्ञानाच्या प्रत्येक विधानाला पुरावा लागतो, परंतु ज्योतिषशास्त्राच्या विधानाला कोणताही पुरावा मिळत नाही. त्यामुळे ज्योतिषशास्त्राला आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने बघता येणार नाही.'' 

""जगभरातील शास्त्रज्ञ संशोधनासाठी एकत्र येत असताना भारत म्हणून आपण कोणती जबाबदारी पार पाडतो हे पाहणे महत्त्वाचे ठरते. सध्या जगभरातील विविध संशोधन संस्थांमध्ये भारतीय संशोधक नेतृत्व करत आहे. संशोधनातील कार्यक्षमता पाहता भविष्यातील संशोधनात भारत नक्कीच जगाचे नेतृत्व करेल, असा विश्‍वास डॉ. रॉयचौधरी यांनी व्यक्त केला. गुरुत्वीय लहरींचा शोध लावणाऱ्या "लायगो' या प्रयोगशाळेचा सामान्य माणसाला होणाऱ्या फायद्याबद्दल डॉ. रॉयचौधरी यांनी या वेळी अधिक माहिती दिली. आयुकामध्ये या वेळी विविध खगोलप्रदर्शनाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT