पुणे

मच्छरदाणीत अनुभवा गारवा; उन्हाळ्यात उपयुकत

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरातील कोरोना आणि उन्हाळ्याचे दिवस आणि विशेष म्हणजे पॉवर कट, लोडशेडिंगच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील भारतीय हवामानशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ डॉ. शिरीष खेडीकर यांनी सूक्ष्म हवामान नियंत्रक मच्छरदाणी विकसित केली आहे. 

मच्छरदाणीच्या जाळीला जोडलेल्या पिशवीत पाणी भरणे आवश्यक आहे, पाणी जाळ्याद्वारे शोषले जाते आणि वाती प्रमाणे वर ओढले जाते. ओल्या जाळीतून पाण्याचे बाष्पीभवन होते. त्या मुळे आतील तापमान ४ ते ८ अंश सेल्सिअसने कमी होते, अशी माहिती डॉ. खेडीकर यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

उष्माघात आणि मलेरियासारख्या डासांच्या आजारांपासून, कीटकांच्या चाव्यापासून, धूळ आणि लहान वन्य प्राण्यांपासून देखील मच्छरदाणी संरक्षण करू शकते. सेल्फ आयसोलेशन'साठी योग्य आहे. पेटंटसाठी अर्ज केला आहे. कोविड 19 च्या संक्रमणाच्या काळात हे तंत्रज्ञान सरकारला देण्यास तयार असल्याचे डॉ. खेडीकर यांनी सांगितले. 

मच्छरदाणी बनवणे अगदी सोपे आहे आणि तयार करण्याचे साहित्य देखील सहज उपलब्ध होऊ शकते. गरजू महिलांना आणि बेरोजगारांना काम मिळू शकते. 
- डॉ. शिरीष खेडीकर, शास्त्रज्ञ, भारतीय हवामानशास्त्र विभाग 

मच्छरदणीचे वैशिष्ट्य 

- मच्छरदणी वापरण्यासाठी १० लिटरपेक्षा कमी पाण्याची गरज 
- उत्पादनाची किमत प्रति युनिट ५००ते ७०० रूपये आहे 
- ३ ते ४ वर्षे सहज वापरता येते 
- देखभाल खर्च व दुरुस्ती आवश्यकता नाही 
- पोर्टेबल, धुण्यायोग्य आणि वापरण्यास सुलभ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VRSची विमानसेवा न वापरण्याचा शिवसेना शिंदे गटाचा निर्णय, शिंदेंच्या मंत्र्यांनीच दिली माहिती

Bribery Case Kolhapur : पोक्सोचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० लाखांची मागणी, तिघांनी लुटायचा प्लॅन आखला पण पोलिसांनी

Latest Marathi News Live Update : शिंदखेडा-विरदेल मार्गावर कापसाने भरलेला ट्रॅक्टर उलटला

Sindhudurg News: ऐतिहासिक निर्णय! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २५ गावं इको सेन्सिटिव्ह, अंतिम अधिसूचना जारी..

Sakal Kolhapur : 'सकाळ' दिवाळी अंकास सलग दुसऱ्यावर्षी राज्यस्तरीय पुरस्कार; मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघातर्फे गौरव

SCROLL FOR NEXT