pune sakal
पुणे

अवसायकामार्फत ठेवीदारांच्या अर्जांची छाननी

शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक; ठेव विमा महामंडळाकडे प्रस्ताव दाखल करणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतील ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्यासाठी सध्या बॅंकेकडे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्यात येत आहे. दरम्यान, ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी क्लेम लवकर सादर करावेत, अशा सूचना ठेव विमा (डीआयसीजीसी) महामंडळाने दिल्या आहेत. त्यानुसार सहकार उपनिबंधक कार्यालयाकडून येत्या २० ऑगस्टपर्यंत ‘डीआयसीजीसी’कडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. (Pune News)

रिझर्व्ह बॅंकेने शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक नुकतीच अवसायनात काढली आहे. बॅंकेच्या खातेदार-ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बॅंकेतील ठेवीदारांच्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण असून, त्या ठेवी परत करण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने अवसायकामार्फत खातेदार आणि ठेवीदारांकडून केवायसीसह अर्ज भरून घेण्यात येत आहेत.

गेल्या आठ दिवसांत ठेवीदारांच्या अर्जांच्या संख्येत वाढ झाली आहे. आत्तापर्यंत सुमारे १३ हजारांहून अधिक खातेदार-ठेवीदारांनी अर्ज दाखल केले आहेत. ठेवीदारांनी दाखल केलेल्या केवायसी अर्जांची छाननी अवसायकामार्फत सुरू आहे. ठेवीदारांनी अर्जासोबत दिलेली कागदपत्रे आणि बॅंकेतील रेकॉर्ड तपासण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांमार्फत दररोज ४० ते ५० अर्जांची छाननी करण्यात येत असल्याची माहिती उपनिबंधक तथा बॅंकेचे अवसायक डॉ. आर. एस. धोंडकर यांनी दिली.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे झेरॉक्स (केवायसी)

  1. ठेव रकमेची पावती

  2. आधार कार्ड

  3. पॅन कार्ड

  4. वीज बिल

  5. इतर बॅंकेचा खाते क्रमांक

  6. आयएफएससी कोड

बॅंकेची सद्यःस्थिती

  1. शाखा १४

  2. एकूण ठेवी ४३२ कोटी रुपये

  3. ठेवीदार संख्या ७१ हजार ७७०

  4. एक लाख रुपयांच्या आतील ठेवीदार : ६३ हजार ६५८

  5. एक लाख ते पाच लाख रुपयांपर्यंत ठेवीदार : ६ हजार ३००

  6. पाच लाख रुपयांवरील ठेवीदार : १ हजार ८१२---------------

(त्यामध्ये पाचशे रुपयांपर्यंत : १८ हजार, पाचशे ते एक हजार रुपये : १२ हजार आणि एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत : १५ हजार खातेदार-ठेवीदार)


ठेव विमा महामंडळाच्या

अधिकाऱ्यांसमवेत नुकतीच ऑनलाइन बैठक झाली. या वेळी ठेवीदारांना त्यांच्या ठेवी दिवाळीपूर्वी परत करण्याबाबत चर्चा झाली. महामंडळाने लवकर क्लेम दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उर्वरित ठेवीदारांनी बॅंकेकडे तातडीने अर्ज दाखल करावेत.

- डॉ. आर. एस. धोंडकर, अवसायक, शिवाजीराव भोसले बॅंक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

E-Peek Survey: दुष्काळाच्या संकटात 'ई-पीक'ची डोकेदुखी;शिरूर कासारमध्ये कचाट्यात शेतकरी; ९६ हजार गटांची नोंदणी रखडली, ओटीपी येईना

SCROLL FOR NEXT