Seal of eight villages in Haveli taluka due to coronavirus 
पुणे

पुणेकरांनो, सावध राहा ! कोरोनामुळे हवेली तालुक्यातील आठ गावांच्या हद्दी सील

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी हवेली तालुक्यातील पिसोळी, वडाचीवाडी, हांडेवाडी, नरहे, खानापुर, लोणीकंद, आणि उरुळी कांचन या आठ गावांच्या हद्दी 18 एप्रिलच्या मध्यरात्री बारा वाजल्यापासून सील करण्यात येणार आहेत. या गावांच्या हद्दीत बाहेरच्या नागरिकांना प्रवेशबंदी असेल. तसेच, या गावातील नागरिकांना बाहेर जाता येणार नाही. याबाबतचे आदेश हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी जारी केले आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. हवेली तालुक्यातही याचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हवेली तालुक्यातील काही ग्रामपंचायतीचा भाग यापूर्वीच सिल करण्यात आला आहे. यानंतर आता आणखी आठ ग्रामपंचायतीच्या हद्दी सील करण्यात येणार आहेत. या आदेशाची अंमलबजावणी मध्यरात्री बारा वाजल्यापासून करण्यात येणार आहे.

या आठ गावांचा परिसर संबंधित पोलिस ठाण्याकडून सील करण्यात येणार आहे. या प्रत्येक गावच्या हद्दीत इतर नागरिकांना प्रवेश बंदी असेल. शहराच्या किंवा इतर गावच्या नागरिकांना सील करण्यात आलेल्या गावात प्रवेशबंदी असेल. तसेच, या गावातील नागरिकांना बाहेर जाता येणार नाही. प्रत्येक नागरिकाला मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. अन्यथा संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 
दरम्यान, अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूच्या विक्रीस या  निर्बंधातून वगळण्यात आले आहे. मात्र, भाजीपाला आणि किराणा माल खरेदी करताना गर्दी टाळावी. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

ICUत उंदराने कुरतडला हात, १२ तासांत महिला रुग्णाचा मृत्यू; रुग्णालयाने डॉक्टरसह नर्सवर केली कारवाई

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील बिंदू चौकात गॅस गळतीमुळे आग

LPG Import India : गॅस संकट कमी होणार ! कतारहून भारतात आणला ४६,००० मॅट्रिक टन LPG; तब्बल 'इतके' लाख सिलिंडर्स भरणार

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT