khadki.jpg 
पुणे

दुकादारांनो सावधान, नियम मोडले तर...

सकाळवृत्तसेवा

खडकी बाजार (पुणे) : रात्री दहा वाजता दुकान उघडून चोरून व्यवसाय करणाऱ्या दुकानदाराची माहिती घेताना अरेरावी करत वाद घालणाऱ्या व्यापाऱ्याचे दुकान खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नाईट राउंड पेट्रोलिंग स्क्वाडने सील केले. ही घटना शनिवार ( ता. ६) रात्री दहा वाजता खडकी बाजार येथील मेहता टॉवर खाली घडली.

सध्या राज्य सरकरच्या आदेशानुसार खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे खडकी बाजार परिसरात सकाळी 9 ते 5 पर्यंत एका बाजूची दुकाने सुरू ठेवण्यास बोर्डातर्फे परवानगी देण्यात आली आहे. 5 वाजल्यानंतर बाजारात एकही दुकान उघडे असणार नाही. त्यासाठी बोर्डाने यासाठी लक्ष ठेवण्यासाठी 24 तास एक पथक नेमले आहे. दिवसा व रात्री हे पथक खडकीत पेट्रोलिंग करीत असते. शनिवारी हे पथक पेट्रोलिंग करीत असताना खडकी बाजार येथील मेहता टॉवर खाली असलेले विजया एजन्सी हे दुकान उघडून दुकानदार एका महिलेला दुकानातील सामान देताना आढळला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तेव्हा बोर्डाचे नाईट पेट्रोलिंग स्क्वाडचे अधिकारी नासीर मुकादम यांनी दुकानदाराला दुकान का उघडे ठेवले असे विचारले असता दुकानदार चिडला व त्याने एकेरी उल्लेख करीत काय करायचे करून घ्या असे म्हणत अरेरावी केली. तेव्हा नासीर मुकादम यांनी दुकानाला टाळे लावल्यानंतर सील केले व सदर घटना बोर्डाचे आरोग्य अधीक्षक बी एस नाईक यांना कळवली. आता खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड या उद्धट नियम मोडणाऱ्या दुकानदाराविरोधात कोणती कारवाई करणार याकडे खडकीकरांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT