SEBC Maratha reservation law made by Fadnavis government is wrong said Praveen Gaikwad 
पुणे

Video : फडणवीस सरकारने केलेला SEBCचा मराठा आरक्षणाचा कायदाच चुकीचा : प्रवीण गायकवाड

सागर आव्हाड

पुणे : ''मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकातील याचा आरक्षण घ्यावा आणि आरक्षणाचा विषय संपवावा'' असं मत आरक्षणाचे अभ्यासक प्रवीण गायकवाड यांनी मांडले आहे.

येत्या 25 जानेवारीला मराठा आरक्षणाबाबात न्यायलयात अंतिम सुनावणी  होणार आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत काय निर्णय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, मराठा समाजतील (SEBC) उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या (EWS) आरक्षणाचा लाभ देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मराठा समाजातील उमेदवारांना शैक्षणिक प्रवेश व सेवाभरती यासाठी आरक्षण लागू व्हावे म्हणून EWSचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सामाजिकदृष्ट्या मागारस प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात EWS आरक्षणातून लाभ घेणे ऐच्छिक असून, उमेदवाराने शैक्षणिक  प्रवेशातील  किंवा शासन  सेवेत भरतीकरिता EWS आरक्षणाचा लाभ घेतल्यास सदर उमेदवार SEBC आरक्षणाच्या लाभास पात्र ठरणार नाही. EWS प्रमाणपत्र देतांना SEBC उमेदवारांना मागील आर्थिक वर्षाच्या उत्पन्न व मत्ता या आधारे राज्य शासनाने विहित केलेले निकष लावण्यात येईल. हे आदेश सर्वोच्च न्यायलयात दाखल करण्यात आलेली विशेष याचिका क्रं.15737/2019 व इतर याचिकांमधील अंतरिम आदेशावरील निर्णयाच्या अथवा अंतिम निर्णयाच्या अधीन राहील.'' असेही मंत्री मंडळाने स्पष्ट केले. 

यापार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या बोलताना गायकवाड म्हणाले, ''मराठा समाजाला विशेष प्रवर्ग म्हणून आरक्षण देणे हे नव्या घटना दुरुस्तीनुसार शक्य नसून मराठा समाजातील मोठा वर्ग हा कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतोय. फडणवीस सरकारने केलेला एसईबीसीचा मराठा आरक्षणाचा कायदाच चुकीचा होता. घटनेच्या चौकटीत असं जातीसाठी वर्ग न निर्माण करता दिलेल आरक्षण टिकू शकत नाही.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gevarai BJP Leader Balraje Pawar Arrest: गेवराईत भाजपच्या बाळराजे पवारांना मध्यरात्री अटक ; नगरपालिका मतदानाच्या दिवशी झाला होता राडा!

Thane News: उंच टॉवर, स्नो पार्क, टाउन पार्क आणि... ठाण्याच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होणार, भव्य प्रकल्पांची घोषणा

किती घाण दाखवताय... मराठी मालिकेतील नवऱ्याचा क्रूरपणा पाहून प्रेक्षक संतापले; म्हणतात- आताचे पुरुष असे आहेत?

Pune Crime : फसवणूक प्रकरणात धनंजय वाडकर व त्याच्या जावयाच्या घरातून कागदपत्रे जप्त; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई!

Junnar Leopard Attack : ओतूरमध्ये दिवसा ढवळ्या बिबट्याचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी!

SCROLL FOR NEXT