द्वितीय अपिलाची ३० हजार प्रकरणे निकाली
माहिती आयुक्त रानडे : सप्टेंबरअखेर ३७०० प्रकरणे प्रलंबित
----
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १० : पुणे माहिती खंडपीठाने द्वितीय अपिलाची ३० हजार प्रकरणे निकाली काढली असून सप्टेंबरअखेर ३ हजार ७०० प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती राज्य माहिती आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली. माहिती अधिकाराचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर जन माहिती अधिकाऱ्यांनी ३० दिवसांच्या आत माहिती देणे बंधनकारक आहे. कार्यालयात उपलब्ध आणि तयार स्वरूपातील अभिलेखांमधून माहिती देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
५ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत माहिती अधिकार सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने पुणे माहिती आयुक्त कार्यालयाच्या वतीने नियोजन भवन येथे झालेल्या प्रशिक्षणात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील आदी उपस्थित होते. श्री. रानडे म्हणाले, नवीन माहिती तयार करण्याची आवश्यकता नाही. प्रथम अपीलाची सुनावणी ४५ दिवसांच्या आत होणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रथम अपिलीय प्राधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध द्वितीय अपील करता येते. पुणे माहिती खंडपीठात सन २०२५ पूर्वी द्वितीय अपिलाची सुमारे १५ हजार प्रकरणे प्रलंबित होती. दरमहा ७०० ते ७५० नवीन प्रकरणे दाखल होत आहेत. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी केले. आभार अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी मानले.
---
आयुक्त रानडे यांच्या सूचना
- प्रत्येक कार्यालयात माहिती अधिकार अर्जांसाठी हवी स्वतंत्र नोंदवही
- शासनाच्या संकेतस्थळावर यापूर्वीच उपलब्ध असलेली माहिती, शासन निर्णय व परिपत्रके पुन्हा माहिती अधिकाराद्वारे देण्याची आवश्यकता नाही.
- जन माहिती अधिकाऱ्यांनी अर्जाची योग्य छाननी करून कायद्यातील तरतुदींनुसार प्रतिसाद द्यावा
- प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांनी सुनावणीत सक्षमपणे निर्णय घ्यावा
- माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर होऊ नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.