second partner of Chhota Rajan Nephew arrested for ransom of Rs 50 lakh in Pune 
पुणे

खंडणी प्रकरण : छोटा राजनच्या पुतणीचा दुसरा साथीदार पोलिसांच्या जाळ्यात

सकाळवृत्तसेवा

पुणे : पिस्तुलातील दहाच्या दहा गोळ्या झाडण्याची धमकी देऊन 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या छोटा राजनची पुतणी प्रियदर्शनी निकाळजे हिच्या दुसऱ्या साथीदाराला खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी मध्यरात्री अटक केली. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी असलेली प्रियदर्शनी निकाळजे अद्याप फरारी आहे. 

सिंहगडावर पर्यटकांची संख्या रोडावली
मंदार वाईकर (रा. निधीषा सोसायटी, मार्केट यार्ड, बिबवेवाडी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. यापुर्वी धीरज बाळासाहेब साबळे (वय 26, रा. धानोरे, ता. खेड) यास 25 लाख रुपयांची खंडणी स्विकारताना पोलिसांनी अटक केली आहे.याप्रकरणी कात्रज येथे राहणाऱ्या 48 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने खंडणी व अमली पदार्थविरोधी पथकाकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यावरुन निकाळजे, साबळे व वाईकर या तिघांविरुद्ध लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
बांधकाम व्यावसायिक असलेल्या फिर्यादीच्या पत्नीला त्याच्यापासून घटस्फोट पाहीजे होता. त्यासाठी पत्नी व तिच्या बहिणीने त्यांच्याकडे तगादा लावला होता. दरम्यान, या प्रकरणामध्ये दोघींची मंदार वाईकर याच्यासमवेत ओळख झाली. वाईकरनेच या प्रकरणामध्ये प्रियदर्शनी निकाळजे ही मध्यस्थी करेल, असे सांगत त्यांची भेट घडवून आणून दिली होती. दरम्यान, निकाळजे, वाईकर व साबळे यांनी संगनमत करून निकाळजे हिने तिच्या संघटनेच्या लेटरहेडवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्या अर्जानुसार गुन्हा दाखल होऊ नये व प्रकरण मिटवून घेण्यासाठी निकाळजे हिने फिर्यादीकडे 50 लाखांची मागणी केली होती. त्यासाठी फिर्यादीस पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे फिर्यादीने 25 लाख रुपये देण्याचे ठरविले होते.

25 लाखांची रक्कम स्विकारतानाच साबळे यास लष्कर परिसरातील अरोरा टॉवर्स येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून निकाळजे व वाईकर यांचा शोध घेतला जात होता. त्यानुसार, रविवारी मध्यरात्री पोलिसांच्या पथकाने वाईकर यास बेड्या ठोकल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Dattatraya Meghe Passes Away: लोकसेवेचा वटवृक्ष निमाला! माजी खासदार, लोकनेते दत्ता मेघे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, विविध क्षेत्रात हाेता दबदबा..

SCROLL FOR NEXT