Crime_Rape 
पुणे

संतापजनक! पुण्यात पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; सिक्युरिटी गार्ड जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

वडगाव शेरी (पुणे) : विमाननगरमधील एका हॉटेलच्या सुरक्षारक्षकाने एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. विमानतळ पोलिसांनी नराधम आरोपीस अटक केली असून पीडित चिमुरडीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

या प्रकरणी करण दिलीपकुमार गोस्वामी (वय.२०, रा.विमाननगर) यास पोलिसांनी अटक केली आहे. लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विमाननगर भागातील एका हॉटेलमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करतो, तर पीडित चिमुरडी आपल्या  आई-वडिलांसोबत एका लेबर कॅम्पमध्ये राहते. तिचे आई-वडील दोघेही कामाला जातात. आई-वडील कामाला गेल्यानंतर पीडित चिमुरडी घरी एकटीच असते, हे आरोपीने हेरले. दुपारी आरोपीने पाच वर्षांच्या चिमुरडीला तिच्या घरातून बाहेर बोलावले आणि तो काम करत असलेल्या हॉटेल शेजारील एका चारचाकी शोरूमच्या पार्किंगमध्ये नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला.

मुलीची आई घरी आल्यानंतर तिने मुलीला भेदरलेल्या अवस्थेत पाहिले. भेदरलेल्या चिमुरडीला विश्वासात घेऊन विचारल्यानंतर चिमुरडीने घडलेला सर्व प्रकार आईस सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने मुलीच्या वडिलांना घरी बोलावून घेतले. विमानतळ पोलिसांना हा प्रकार  समजल्यानंतर आरोपीची ओळख पटवून त्याला ताब्यात घेण्यात आले. या चिमुरडीवर सध्या पुण्यातील एका सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games MMA : अवघ्या ७०० ग्रॅमने सुवर्णपदकाची संधी हुकली!; अाशियाई क्रीडा स्पर्धा ; सुचिका तारियालला मिक्स्ड मार्शल आर्ट्‌समध्ये ब्राँझपदक

फुलांची आरास अन् गणपतीचं गोंडस रूप! पुण्यात या ठिकाणी आहे नाना पाटेकरांचा गणपती; राहुल देशपांडेंनी शेअर केला फोटो

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Radhanagari Dam Gate Opens : राधानगरी धरणाचा क्रमांक तीनचा स्वयंचलित दरवाजा उघडला; धरणातून 2628 क्युसेक विसर्ग, घाटमाथ्यावर दमदार पाऊस

Kolhapur Gokul Election 2026 : आमदार, माजी आमदारांसह बडे नेते 'गोकुळ'च्या रिंगणात; एकाच दिवशी 133 इच्छुकांचे 205 उमेदवारी अर्ज दाखल, आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT