Job 
पुणे

बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या 105 विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड

मिलिंद संगई

बारामती - गेल्या वर्षभरापासून सुरु असलेला लॉकडाऊन आणि त्यामुळे उदयॊगक्षेत्रात आलेली मंदी यामुळे विद्यार्थ्यांसाठी नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाहीत, अशा आव्हानात्मक वातावरणात बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयाने 105 विद्यार्थ्यांना दर्जेदार नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. आर.एस. बिचकर यांनी ही माहिती दिली. लॉकडाऊनच्या काळात महाविद्यालयातर्फे विविध कंपन्यांचे ऑनलाइन ऑनकॅम्पस व ऑफकॅम्पस ड्राईव्हसचे आयोजन करण्यात आले होते त्यामधून 105 विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टीसीएस, बायजूस, इन्फोसिस, पर्सिस्टन्ट सिस्टिम्स, यार्डी सॉफ्टवेअर, एंझीग्मा सॉफ्टवेअर, रिलायन्स जिओ, माईंडट्री, एक्सेंचर, कॅनान, अँमडॉक्स, पियाजिओ व्हेईकल्स, कल्याणी टेक्नोफोर्ज, सामा टेक्नॉलॉजीज या कंपनीत मुलांना रोजगाराची संधी मिळाली. नुकत्याच झालेल्या गेट 2021 या आयआयटीतर्फे देशपातळीवर घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. महाविद्यालयाचे 15 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी अनुज फुलारी हा राष्ट्रीय स्तरावर 164 क्रमांकाने आणि चेतन बनकर हा 1240 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची माहिती अशी माहिती महाविद्यालयाचे गेट एक्झाम कोऑर्डिनेटर श्रीनिवास शेळगे यांनी दिली.

विद्यार्थ्यांना चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध आहे व येणाऱ्या काळात अजून नवनवीन कंपन्यांचे प्लेसमेंट ड्राईव्हसचे आयोजन करण्यात येईल अशी माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विशाल कोरे यांनी दिली.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबईत ताज हॉटेलसमोरचं मोठं झाड कोसळलं, गाडीचं नुकसान

SCROLL FOR NEXT