Artificial Intelligence : शेतकरी कुटुंबातील संकेत काचोळे याची कॅनडातील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड sakal
पुणे

Artificial Intelligence : शेतकरी कुटुंबातील संकेत काचोळे याची कॅनडातील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड; कृत्रिम मानवी मेंदूबाबत केलं संशोधन

संकेत चे वडील सुभाष काचोळे हे एक यशस्वी उद्योजक असून त्यांनी शिरदाळे गावचे पाच वर्ष सरपंचपद भूषवलेले आहे.

सुदाम बिडकर

Artificial Intelligence - पारगाव शिरदाळे ता. आंबेगाव येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तालुक्यातील संकेत सुभाष काचोळे या तरुणाने कृत्रिम मानवी मेंदू तयार करणे या महत्वपूर्ण विषयावर तयार केलेल्या संशोधनाची कॅनडा देशात 19 जुनला होणाऱ्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड झाल्याने संकेत काचोळे याचे परिसरात कौतुक होत आहे.

आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागात डोंगरावर वसलेले जेमतेम चारशे ते पाचशे लोकसंख्या असलेले शिरदाळे हे छोटेसे गाव आहे, कायमस्वरूपी दुष्काळ तसेच खडक माळरानावर वसलेले गाव अशी या गावाची ओळख आहे. येथील संकेत काचोळे हा चार वर्षांपूर्वी लंडन येथील किंग्स्टंन विद्यापीठामध्ये कृत्रिम मानवी मेंदू तयार करणे.

या महत्वपूर्ण विषयावरती संशोधन करण्यासाठी गेला होता गेल्या चार वर्षापासून त्याने जिद्द अथक प्रयत्नाने तसेच मेहनतीने हे संशोधन केले आहे, त्याच्या या मेहनीतीला खऱ्या अर्थाने यश मिळाले असून येत्या 19 जूनला कॅनडामध्ये होणाऱ्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी त्याच्या या संशोधनाची निवड झाली लवकरच जागतिक स्तरावरील तज्ञांसमोर संशोधन सादर करण्याची संधी त्याला भेटणार आहे.

संकेतचे संपूर्ण शालेय शिक्षण निगडी प्राधिकरण शिक्षण संस्थेत झाले असले तरी त्याने आपली गावाशी असणारी नाळ कायम घट्ट ठेवलेले आहे, संकेत चे वडील सुभाष काचोळे हे एक यशस्वी उद्योजक असून त्यांनी शिरदाळे गावचे पाच वर्ष सरपंचपद भूषवलेले आहे.

संकेत काचोळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News :सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात...

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT