Selection Test Competition for Maharashtra Kesari sakal
पुणे

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरीसाठी वारजे मध्ये निवड चाचणी स्पर्धा संपन्न

धाराशिव येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी साठी निवड चाचणी कुस्ती स्पर्धा वारजे येथे संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार अशोक मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले होते.

सकाळ वृत्तसेवा

वारजे - धाराशिव येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी साठी निवड चाचणी कुस्ती स्पर्धा वारजे येथे संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार अशोक मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले होते.

धाराशिव येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये पुणे शहर कुस्तीगीर संघ आणि तालीम संघ पुणे जिल्हा सहभागी होणार आहे. यासाठी दोन्ही संघाची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा हिंदकेसरी अमोल बराटे व उद्योजक शरद बराटे यांच्या वाढदिवसानिमित्त वारजे येथे 25 ते 26 ऑक्टोबर या कालावधीत पार पडली.

उद्घाटनपर भाषणात माजी खासदार मोहोळ म्हणाले धाराशिव येथे होणाऱ्या 65 वी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब साठी दिली जाणारी मानाची गदा ही परंपरेनुसार महाराष्ट्र कुस्तीगर परिषदेचे संस्थापक स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ दिली जाणार आहे. असे मोहोळ यांनी यावेळी जाहीर केले.

याप्रसंगी आमदार भिमराव तापकीर, अर्जुनवीर काका पवार, माजी नगरसेवक दिलीप बराटे, राहुल आवारे, उद्योजक शरद बराटे, वस्ताद विजय बराटे, विजय बनकर, अभिजीत कटके, उपस्थित होते.

या निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन पुणे शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हिंदकेसरी अमोल बराटे आणि तालीम संघ पुणे जिल्हा अध्यक्ष रुस्तम-ए-हिंद अमोल बुचडे यांनी केले होते. या निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत शहर विभागातून 250 आणि जिल्हा विभागातून 230 कुस्तीगीर सहभागी झाले होते.

ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी भारतभूषण बराटे, अमर बराटे, सागर गरुड, लाला काळेकर, महेंद्र कुंजीर, प्रमोद पारखी, दत्ता भिलारे, नितीन निंबाळकर, सुरज जाधव, सुरज पाटील यांनी सहकार्य केले. तर मुख्य पंच म्हणून रवी बोत्रे यांनी काम पाहिले.

स्पर्धेचा अंतिम निकाल खालील प्रमाणे

पुणे शहर कुस्तीगीर संघ

गादी विभाग

  • 57 किलो - 1) दिपक पवार

  • 61 किलो - 1) भालचंद्र कुंभार

  • 65 किलो - 1) प्रितेश वाघमारे

  • 70 किलो - 1) संकेत ठाकूर

  • 74 किलो - 1) अक्षय चव्हाण

  • 79 किलो - 1) मंगेश कोळी

  • 86 किलो - 1) वैभव तांगडे

  • 92 किलो - 1) अभिजित भोईर

  • 97 किलो - 1) पंकज पवार

खुला गट -

1) हर्षद कोकाटे

2) आनंद मोहोळ

माती विभाग

  • 57 किलो - 1)कृष्णा हरणावळ

  • 61 किलो - 1)रोहन उंद्रे

  • 65 किलो - 1)विनोद धायगुडे

  • 70किलो - 1)निखिल कदम

  • 74 किलो - 1)शुभम थोरात

  • 79 किलो - 1)मयूर दगडे

  • 86 किलो - 1)गणेश खडके

  • 92 किलो - 1)अथर्व चव्हाण

  • 97 किलो - 1)पृथ्वीराज खडके

खुला गट -

1) साकेत यादव

2) सोमनाथ डोंबाळे

तालीम संघ पुणे जिल्हा

गादी विभाग

  • 57 कि. 1) स्वप्नील शेलार -बारामती

  • 61 कि. 1) अभिषेक हिंगे - मावळ

  • 65 कि. 1) केतन घारे - मावळ

  • 70 कि. 1) निखिल वाघ - आंबेगाव

  • 74 कि. 1) प्रतीक आवारे - भोर

  • 79 कि. 1) अक्षय कामठे - पुरंदर

  • 86 कि. 1) अक्षय चोरगे - हवेली

  • 92 कि. 1) यशराज चोरमले इंदापूर

  • 97 कि. 1) ओमकार येलभर - शिरूर

खुला गट -

1) तुषार डुबे - दौंड

माती विभाग

  • 57 कि. 1) संग्राम जगताप - पुरंदर

  • 61 कि. 1) अमोल वालगुडे - वेल्हा

  • 65 कि. 1) सुरज कोकाटे - इंदापूर

  • 70 कि. 1) अरुण खेंगले - खेड

  • 74 कि. 1) अनिल कचरे - इंदापूर

  • 79 कि. 1) अविनाश गावडे - इंदापूर

  • 86 कि. 1) संतोष पडळकर -बारामती

  • 92 कि. 1) अंगत बुलबुले - बारामती

  • 97 कि. 1) ज्ञानेश्वर येलभर - शिरूर

खुला गट -

1) अनिकेत मांगडे - हवेली

2) मनिष रायते - इंदापूर

हर्षल कोकाटे, तुषार डुबे गदेचे मानकरी

65 व्या महाराष्ट्र केसरी पुणे शहर व जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत हर्षद कोकाटे (हनुमान आखाडा) याने आंतर राष्ट्रीय कुस्ती संकुलचा साकेत यादव याला गुणावर पराभूत करून पुणे शहर कुस्तीगीर संघाची मानाची गदा मिळविली. तालीम संघ पुणे जिल्ह्याची मानाची गदा दौंड तालुक्याचा तुषार डुबे याने हवेली तालुक्याचा अनिकेत मांगडे याला गुणावर पराभूत करून पटकविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT