पुणे

‘शस्त्रास्त्रांमध्ये आत्मनिर्भर भारत’वर पालकर शाळेत व्याख्यान

CD

पुणे, ता. ११ : कर्वेनगरमधील अभिजात एज्युकेशन सोसायटी संचलित ग. रा. पालकर प्राथमिक शाळेत क्रांती दिन आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘शस्त्रास्त्रांमध्ये आत्मनिर्भर भारत’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी हिंदू जनजागृती समितीच्या ‘क्रांतिगाथा’ प्रदर्शनासह विद्यार्थ्यांनी चित्रांच्या माध्यमातून साकारलेल्या ‘क्रांती गॅलरी’चे आयोजन करण्यात आले.

संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि शस्त्रास्त्रतज्ज्ञ काशिनाथ देवधर यांनी विद्यार्थ्यांना भारताने शस्त्रास्त्र निर्मितीच्या क्षेत्रात साधलेली प्रगती आणि आत्मनिर्भरतेचा प्रवास सचित्र समजावून सांगितला. भारतातच निर्मिती केलेली तसेच तिन्ही संरक्षण दलांकडून वापरली जाणारी विविध शस्त्रास्त्रे आणि संरक्षण साधनांची छायाचित्रे पडद्यावर दाखवली. भारताची संरक्षण क्षमता, स्वदेशी तंत्रज्ञान आणि देशाच्या संरक्षण क्षेत्रातील प्रगती याबाबत देवधर यांनी मार्गदर्शन केले. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासोबत घालवलेल्या आठवणींनाही त्यांनी या वेळी उजाळा दिला. शाळेच्या संचालक अमला भागवत, कार्यवाह सुप्रिया पालकर, मुख्याध्यापिका वैशाली पाथ्रुडकर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन मानसी कुलकर्णी यांनी केले, तर अमोल जानतीकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

58 वर्षांनंतर नवरात्रीत बनतोय दुर्मीळ योग! ‘या’ 3 राशींवर होणार विशेष कृपा म्हणे; पैसा, नोकरी अन् व्यवसायात मिळू शकतो मोठा फायदा

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

Marathi News Live Updates: कसबा मंदिरातील दानपेटी फोडली

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

SCROLL FOR NEXT