selfie was the last youth drowned in Khadakwasla dam pune
selfie was the last youth drowned in Khadakwasla dam pune  sakal
पुणे

सेल्फी ठरला शेवटचा; तरुणाचा खडकवासला धरणात बुडून मृत्यू

निलेश बोरुडे

किरकटवाडी: खडकवासला धरणात मित्रांबरोबर हुल्लडबाजी करत पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. योगेश नवनाथ नवले (वय 18, रा. बिबवेवाडी, पुणे) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पीएमआरडीए अग्निशमन दल व हवेली पोलीसांना पाण्यातून मृतदेह शोधून काढण्यात यश आले आहे.

मुळचा अहमदनगरच्या राशिन येथील असलेला योगेश कामासाठी पुण्यात आलेला होता. तो रविवार पेठेतील एका दुकानात कामाला होता. आज सुट्टी असल्याने तो त्याच्या इतर चार मित्रांसह खडकवासला धरणात पोहण्यासाठी आला होता. योगेश व इतर चौघे चौपाटीजवळ खडकवासला धरणात उतरले. पाचही मित्रांची मिळून पाण्यात हुल्लडबाजी सुरू होती. मित्रांनी बाहेर आल्यावर अंगाला माती लावल्याने योगेश अंग धुण्यासाठी पुन्हा पाण्यात शिरला व दिसेनासा झाला.

पाण्यात गेलेला योगेश दिसेना म्हणून इतर मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. तेथून जवळच कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस हवालदार विलास बांबळे, कॉन्स्टेबल मकसूद सय्यद, होमगार्ड शांताराम राठोड, प्रविण घुले व विजय भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन केंद्र प्रमुख सुजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओंकार इंगवले, पंकज माळी, योगेश मायनाळे,सुरज इंगवले व अक्षय काळे या जवानांनी योगेश चा मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून हवेली पोलीसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT