pimpari-sabha.jpg 
पुणे

Vidhan Sabha 2019 : स्वार्थी आणि संधीसाधू राजकारण देशासाठी घातक : योगी आदित्यनाथ  

सकाळ वृत्तसेवा

Vidhan Sabha 2019 : लोणावळा : ''स्वार्थी आणि संधीसाधू राजकारण हे देश आणि समाजासाठी घातक आहे, अशांचे समर्थन करू नका असे सांगत देशाच्या स्वाभिमान आणि सम्मान यांच्याशी सौदेबाजी होऊ शकत नाही''असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी लोणावळ्यात व्यक्त केले.

मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना व आरपीआय महायुतीचे उमेदवार संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार बाळा भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, सूर्यकांत वाघमारे, तालुकाध्यक्ष राजू खांडभोर, प्रशांत ढोरे, रवींद्र भेगडे, शहराध्यक्ष श्रीधर पुजारी, सुनील इंगुळकर, यमुना साळवे, कमलशील म्हस्के आदी यावेळी उपस्थित होते.

''राजकारण हे समाज आणि राष्ट्राला समर्पित हवे, जे लोक भाजपला सोडून पक्षाच्या विरोधात लढत आहेत ते स्वार्थाचे राजकारण करत असल्याची'' टीका योगी आदित्यनाथ यांनी यावेळी केली. कालपर्यंत भाजप त्यांच्यासाठी सर्वकाही होता आणि आज ते पक्षास विरोध करत आहेत याचा अर्थ त्यांना कोणी आमिष दाखविले तर ते राज्याच्या, देशाच्या विरोधातही उभे राहतील'' असे योगी म्हणाले. मोदींच्या नेतृत्वाखाली काश्मीर मधील ३७० कलम रद्द झाले. देशात सध्या सुरक्षेचे वातावरण आहे. भविष्यात देशातून आतंकवाद, नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करणार असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला.

''मोदींच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला विकासाच्या एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. स्वार्थी राजकारण न करता विकासाचे राजकारण करणारा आमदार हवा असेल तर बाळा भेगडे याना मतदान करा,'' असे आवाहन योगी यांनी केले.

आमदार बाळा भेगडे म्हणाले, ''विरोधक आज १४०० कोटी रूपायांची कामे कुठे केली असा सवाल करत आहेत, जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा व्यासपीठावर याविकास कुठे झाला ते दाखवू. आज मावळात तळेगावात २५० कोटी, लोणावळा, देहूरोड येथे प्रत्येकी ९०, हायब्रीड अन्यूटी योजनेतून २७५ व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ७५ कोटींचे रस्ते, मुख्यमंत्री पेयजल १०० कोटी, तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत १४८ कोटी रुपयांची कामे मार्गी लागली , असे भेगडे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo : भावनिक क्षण! ख्रिस्तियानो रोनाल्डो रडला... मैदानावर एकटा उभा राहिला; फुटबॉलविश्व स्तब्ध Video

Portugal vs Spain : स्वप्न तुटले! ख्रिस्तियानो रोनाल्डोचा वर्ल्ड कप प्रवास संपला! पोर्तुगालला माजी विजेत्या स्पेनकडून पराभवाचा धक्का

Pune Heavy Rain : पुणेकर त्रस्त; यंत्रणा मात्र सुस्त, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला उशिरा जाग

LPG import updates: 'एलपीजी'बाबत सरकारने प्लॅन बदलला! अमेरिकेसोबत मोठा निर्णय, गॅसचं संकट टळणार

Pune Heavy Rain : पावसाने दाणादाण! जनजीवन विस्कळित, घरांसह दुकानांमध्ये शिरले पाणी

SCROLL FOR NEXT