takawe
takawe 
पुणे

विद्यार्थ्यांचा शिक्षकांना निरोप

सकाळवृत्तसेवा

टाकवे बुद्रुक (पुणे) : आंबळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपशिक्षक मुकुंद तनपुरे, जयश्री चांदबोधले, अंजना परदेशी यांचा ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. मागील काही वर्षे हे शिक्षक येथे कार्यरत होते. नुकत्याच शासनाने सर्व शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या केल्या, हेही शिक्षक बदलून दुसऱ्या शाळेत रूजू झाले.

शाळेसाठी या शिक्षकांनी दिलेल्या योगदानामुळे शाळेत अनेक महत्वाचे बद्दल झाले आहेत. विशेषतः लोकसहभागातून शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध केलेले काम असो, किंवा गुणवत्ता वाढीसाठी घेतलेले उपक्रम असो,याची जाणीव गावकऱ्यांनी ठेवून या गुरूजनांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

शिक्षकांनी विद्यार्थी, पालक व गावकऱ्यांशी घट्ट नात जखडून ठेवल्याने, शहराचा अगदी नजीक ही शाळा असून पालकांचा कल इंग्रजी माध्यम वगळून आजही मराठी माध्यमाचा ओढा कायम आहे.  संदीप कांबळे, स्वाती शेवकर,वंदना अल्हाट या नव्याने रूजू झालेल्या शिक्षकांचे स्वागत करण्यात आले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, पालक उपस्थित होते.

मुख्याध्यापक चंद्रकांत हेमाडे यांनी प्रास्ताविक केले. शैला तांबे यांनी सूत्रसंचालन केले. भरत आंभोरे यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT