senior citizen call girl 30 lakhs case registered against two including woman who demanded extortion pune crime marathi news Sakal
पुणे

Pune Crime : ज्येष्ठ नागरिकाला ‘कॉल गर्ल’ची भेट पडली ३० लाखांना; खंडणी मागणाऱ्या महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने जुलैमध्ये ज्योतीमार्फत एका‘कॉल गर्ल’ची भेट घेतली होती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘कॉल गर्ल’ची भेट एका ७४ वर्षीय नागरिकाला चांगलीच महागात पडली. पोलिसांच्या कारवाईची भीती दाखवून आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाला ३० लाख रुपयांना लुबाडले. इतकेच नव्हे तर आरोपींनी दरमहा एक लाख रुपयाची खंडणी मागितली. अखेर ज्येष्ठ नागरिकाने धाडस दाखवत पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांनी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हा प्रकार पाच जुलै ते १७ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मार्केट यार्ड परिसरात घडला. याबाबत गोखले नगर येथील एका ज्येष्ठ नागरिकाने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ज्योती बनसोडे आणि रामचंद्र बापू कोरडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने जुलैमध्ये ज्योतीमार्फत एका‘कॉल गर्ल’ची भेट घेतली होती. त्यानंतर ज्योतीने फिर्यादीला फोन केला. ‘त्या ‘कॉल गर्ल’ला पोलिसांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. तिच्या मोबाईल कॉल रेकॉर्डमध्ये तुमचा कॉल आहे. पोलिस या गुन्ह्यात तुमचेही नाव टाकतील,’ अशी भीती दाखवून पैसे मागितले. त्यामुळे प्रतिष्ठेपोटी या ज्येष्ठ नागरिकाने आरोपींना रोख आणि धनादेशाद्वारे वेळोवेळी ३० लाख ३० हजार रुपये दिले.

परंतु आरोपींचे पैशांचे लालच थांबत नव्हते. आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाला पुन्हा पाच लाखांची खंडणी मागितली. शिवाय, दरमहा एक लाख रुपये न दिल्यास पोलिस कारवाई करतील, अशी धमकी दिली. आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून ज्येष्ठ नागरिकाने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर त्यांनी मार्केट यार्ड पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT