senior citizen cycle rally from Pune to Sunderbans pune  sakal
पुणे

पुणे : साठीतील सायकलवीरांचा पुणे ते सुंदरबन सायकल दौरा

पुण्यातील साठीतील ६ सायकलवीरांनी पुणे ते सुंदरबन हा तब्बल २१०० किलोमीटरचा प्रवास अवघ्या १६ दिवसात पूर्ण केला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वय झाले म्हणून जगण्याला मर्यादा घालणारे आहेतच परंतु यामध्ये उतारवयातही आयुष्य भरभरून जगणारे निश्चितच वेगळे ठरतात. असेच पुण्यातील साठीतील ६ सायकलवीरांनी पुणे ते सुंदरबन (पश्चिम बंगाल) हा तब्बल २१०० किलोमीटरचा प्रवास अवघ्या १६ दिवसात पूर्ण केला. या उपक्रमासाठी निवारा वृद्धाश्रमातील व्ही-३ फिटनेसच्या वतीने या ज्येष्ठ सायकलवीरांचा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जुगल राठी, व्ही ३ फिटनेसचे विकास मालपुटे आदी उपस्थित होते. या उपक्रमात निरुपमा भावे, अपर्णा महाजन, एकादशी कोल्हटकर, ज्योती भक्ता, चंद्रशेखर व्यंकटरमन आणि जयंत देवधर यांनी सहभाग घेतला होता.यावेळी कोल्हटकर म्हणाल्या, ‘‘अनेकांना महिला सायकलवर प्रवास करतात याचं आश्चर्य वाटतं. आम्ही जेव्हा गावात जातो तेव्हा त्या लोकांना आमचे खूप कुतूहल वाटते. त्यांना आमच्या सायकलला हात लावायचा असतो, आमच्या बरोबर फोटो काढायचा असतो. अनेकजण आमचा सत्कार करतात तर काही लोक मदत करण्यासाठी ही पुढे येतात. त्यामुळे सायकल प्रवास हा आयुष्यातील अनुभवांची शिदोरी आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : भुसावळमध्ये संत गाडगेबाबा कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT