साताऱ्यात ज्येष्ठांच्या
उपक्रमांना प्रतिसाद
सातारा, ता. २ : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, तसेच महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील तीनशे ज्येष्ठ नागरिकांनी यात सहभाग नोंदवला.
सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांनी ज्येष्ठ नागरिक हे समाज आणि राष्ट्राची अनुभवसंपन्न संपत्ती असून, शासन ज्येष्ठांच्या कल्याणासाठी कार्यरत असून, बदलत्या काळानुसार डिजिटल साधनांचा सुरक्षित वापर करण्याचे आवाहन केले.
येथेच क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदाब व रक्तशर्करा तपासणी करून शारीरिक व्यायामाबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या ॲड. अमृता ताटे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर हक्क, कौटुंबिक सुरक्षेबाबतची माहिती दिली.
ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व न्यायव्यवस्थेतील संबंधित मान्यवरांना सादर करण्यात आले. जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश घुले यांनीही या वेळी मनोगत नोंदवले.
....................
निरायम ज्येष्ठ संघाची
सोमवारी सभा
सातारा, ता. २ : शाहूपुरी येथील निरायम ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेचे सोमवारी (ता.५ ) सायंकाळी पाच वाजता आयोजन करण्यात आहे. ही सभा रांगोळे कॉलनीतील धनंजय ट्रान्स्पोर्ट येथे शकुनी कुलकर्णी यांच्या अध्यक्षेखाली होणार आहे. सभेत ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या सभासदांचे वाढदिवस साजरे करण्यात येणार आहेत. या सभेस सर्व सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने विजय वैद्य यांनी केले आहे. याच सभेत विजय वैद्य यांच्या पुस्तकाचेही प्रकाशन होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.