Parvatibai Zende Sakal
पुणे

विजेचा शॉक लागल्याने ज्येष्ठ नागरिक महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू

दोषींवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबियांसह स्थानिक नागरिकांनी केली

सकाळ वृत्तसेवा

विश्रांतवाडी : महापालिकेच्या पथदिव्यांच्या विजेचा शॉक लागल्याने ज्येष्ठ नागरिक महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कतारवाडी,भारतनगर येथे शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेत पार्वतीबाई हिरामण झेंडे (वय 70) या ज्येष्ठ नागरिक महिलेचा दुर्दैवाने मृत्यू झाला असून या प्रकरणी जबाबदार दोषींवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबियांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे. या गंभीर अपघातानंतरदेखील घटनास्थळी महापालिका विद्युत विभागाच्या एकाही अधिकारी अथवा कर्मचार्याने भेट दिली नाही. तसेच स्थानिक नगरसेविका शीतल सावंत या संपर्क करण्याचा प्रयत्न करत असताना कोणताही प्रतिसाद दिला नाही.

येरवडा येथील कतारवाडी, भारतनगर येथील पार्वतीबाई झेंडे यांना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास महापालिकेच्या पथदिव्यातून अचानक विजेचा शॉक लागला. या घटनेत त्यांचा दुर्दैवाने उपचारापूर्वी जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन दिव्यांग मुली असा परिवार आहे. पार्वतीबाई याच मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. त्यातच मागील वर्षी एका मुलीचे कोरोनाने निधन झाले आहे. आज अचानक घडलेल्या या अपघातामध्ये पार्वतीबाई यांचेदेखील दुर्दैवाने निधन झाले.

या गंभीर घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी विश्रांतवाडी पोलिस स्टेशन येथे संबंधित जबाबदार दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. स्थानिक नगरसेविका शीतल सावंत, सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ कांबळे, सुनील घाटके, सावित्रीबाई भांडवले यांनी त्यांच्या कुटुंबीय व स्थानिक नागरिकांच्या वतीने कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी विश्रांतवाडी पोलिसांना निवेदन दिले. वेळोवेळी सूचना करून देखील महापालिका विद्युत विभाग अशा गंभीर समस्यांची दखल घेत नाही.

प्रभाग समितीसह मुख्य सभेत या संदर्भातील तक्रारी मांडूनदेखील महापालिका अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. या दुर्दैवी घटनेसाठी जबाबदार म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नगरसेविका शीतल सावंत यांनी केली आहे. "भारतनगर येथील अपघाताच्या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी दोषींवर कारवाई करावी यासंदर्भात निवेदन दिले असून तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल "अशी माहिती विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लहू सातपुते यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT