Corona Booster Dose sakal
पुणे

रविवारीही मिळणार आता पुणे शहरातील ज्‍येष्ठांना लस

पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकांचे बुस्टर डोसचे लसीकरण वेगात करण्यासाठी आता रविवारी देखील महापालिकेची लसीकरणकेंद्र सुरू राहणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकांचे बुस्टर डोसचे लसीकरण वेगात करण्यासाठी आता रविवारी देखील महापालिकेची लसीकरणकेंद्र सुरू राहणार आहेत.

पुणे - शहरातील ज्येष्ठ नागरिकांचे (Old People) बुस्टर डोसचे (Booster Dose) लसीकरण (Vaccination) वेगात करण्यासाठी आता रविवारी देखील महापालिकेची (Municipal) लसीकरणकेंद्र सुरू राहणार आहेत. पुढच्या रविवारी म्हणजे ३० जानेवारीपासून कोणते केंद्र सुरू राहतील याचे नियोजन लवकरच पुणे महापलिकेतर्फे जाहीर केले जाणार आहे.

पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या कोरोना आढावा बैठकीमध्ये महापालिकेने शहरातील सद्यस्थितीचे सादरीकरण केले. त्यावेळी लसीकरणाची माहिती घेताना अजित पवार यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठीही रविवारी लसीकरण सुरू ठेवा असे आदेश दिले आहेत.

पुणे शहरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे, वद्धापकाळात इतर आजारांनी त्यांना ग्रासलेले असते, रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने त्यांना कोरोनाचा धोका जास्त आहे. त्यामुळे ६० पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण वेगात होणे गरजेचे आहे.

गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत शहरातील ४ लाख ८७ हजार ८८५ ज्येष्ठांनी एक डोस घेतला आहे. तर ४ लाख २८ हजार ६६४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. १० जानेवारी ते २० जानेवारी या कालावधीत १७ हजार ३८९ ज्येष्ठांनी बुस्टर डोस घेतला आहे. महापालिकेला येत्या काळात आणखी किमान चार लाख ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस द्यायचा असल्याने या मोहिमेची गती वाढवली जाणार आहे.

महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सुर्यकांत देवकर म्हणाले, ‘‘पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये रविवारी ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू ठेवण्याचे आदेश मिळाले आहेत. त्यानुसार शहरातील कोणते केंद्र सुरू राहणार आहेत याचे नियोजन जाहीर केले जाईल. सध्या सोमवार ते शनिवार लसीकरण सुरू आहे. त्यामध्ये कोव्हीशील्डचे १८० व कोव्हॅक्सीनचेही लसीच्या उपलब्धतेनुसार केंद्रांची संख्या निश्‍चीत केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे भाव

White Stork in Ratnagiri : महाराष्ट्रात दुर्मीळ असलेला 'युरोपियन पांढरा करकोचा' रत्नागिरीत अवतरला; जाणून घ्या या परदेशी पाहुण्याचा थक्क करणारा प्रवास

कधी राम तर कधी परशुराम! रणबीर कपूरचा अनोखा अवतार पाहून चाहते थक्क; BTS VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : स्वच्छ सर्वेक्षणात इंदूर अजूनही अव्वल; गुणपत्रिका जाहीर होऊ द्या: महापौर

IND vs PAK Asia Cup Final : भारत-पाकिस्तान, हे आशिया चषक जेतेपदासाठी भिडणार! पण हा सामना केव्हा, कुठे, किती वाजता Live पाहता येणार? कोणतं चॅनेल?

SCROLL FOR NEXT