पुणे

ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांचे निधन

सकाळवृत्तसेवा

पुणे : वकिली आणि सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे कार्यरत असलेले राज्यातील ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. ते 77 वर्षाचे होते. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते.

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवासह विविध वकिल संघटनांचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. तसेच ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. राज्यातील विविध सामाजिक संस्थांच्या कमिटीवर देखील त्यांचा समावेश होता. वकिलीची प्रॅक्टिस करत असताना त्यांनी अनेक तरुण वकील घडवले आहेत. बदलते कायदे व वकिली आणि न्यायालयीन व्यवस्थेबाबत त्यांनी राज्यभरात शेकडो व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा ऍड. अविनाश आव्हाड, मुलगी, पत्नी असा परिवार आहे. आव्हाड यांचे बंधू सुधाकरराव आव्हाड देखील ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून परिचित आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाऊनच्या काळात देखील कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी केले. विविध वृत्तपत्रे, मासिके, दिवाळीअंक यातून लेखन करून समाजात कायद्याविषयी जनजागृती व्हावे यासाठी त्यांनी लिहिलेले लेख वाचनीय आहेत. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एका खेड्यात जन्म झालेल्या आव्हाड यांना महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थानी अनेक पुरस्काराने गौरवले होते. त्यांच्या निधनामुळे वकिली क्षेत्रातील माहितीचा भांडार आणि चांगले मार्गदर्शक हरपल्याची भावना वकील व्यक्त करत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Krupadan Awale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT