crime sakal
पुणे

वरिष्ठ अधिकाऱ्याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला अत्याचार

कंपनीत वरिष्ठ पदावर असल्याचा गैरफायदा घेत, तसेच प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर एकाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

कंपनीत वरिष्ठ पदावर असल्याचा गैरफायदा घेत, तसेच प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर एकाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे - कंपनीत वरिष्ठ पदावर असल्याचा गैरफायदा घेत, तसेच प्रेमाच्या जाळ्यात (Love Trap) ओढून तरुणीवर (Girl) एकाने अत्याचार (Tyranny) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसांनी (Police) मंगळवारी (ता. १) गुन्हा (Crime) दाखल केला.

राहुलकुमार सिंग (वय ३७, रा. खराडी) आणि मालव आचार्य (वय ३०, रा. अहमदाबाद ) ही संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी अहमदाबाद येथील एका तरुणीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना मांजरी, खराडीसह वेगवेगळ्या ठिकाणी ऑक्टोबर २०२० च्या पहिल्या आठवड्यापासून ११ जून २०२१ दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी शहरातील एका खासगी कंपनीत नोकरीस होती. राहुलकुमार तिचा वरिष्ठ अधिकारी होता. त्याने पदाचा गैरफायदा घेऊन तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्यासोबत लग्न करतो, असे आमिष तरुणीला दाखवले व तिच्यावर वारंवार बलात्कार केला.

तरुणीने आरोपीकडे लग्न करण्याबाबत विचारणा केली असता त्याने मालव आचार्य याच्या मदतीने तिच्या राहत्या ठिकाणी तसेच कंपनीमध्ये बदनामी केली. तिला पुण्यातील राहते घर सोडायला लावून अहमदाबादला परत जाण्यास भाग पाडले. तसेच पोलिस तक्रार केल्यास तिला व तिच्या कुटुंबीयांना ठार करण्याची धमकी तो वारंवार देत होता. त्याच्या छळाला कंटाळून अखेर तरुणीने फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Piyush Goyal : पावभाजीची चव रोबोट देऊ शकणार नाही; वैभव सूर्यवंशीसारखा सिक्सरही नाही! कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मर्यादा आणि भारतातील संशोधनाच्या संधींवर पियुष गोयल यांची मांडणी

IND vs NZ 2nd T20: ६ चेंडूंत ११ धावा, शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! तिलक-नितीशने पलटवला सामना, भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय!

Ankita Bhandari Killed : अंकिता भंडारी हत्ये प्रकरणी माजी आमदार आणि अभिनेत्री नार्को टेस्टसाठी तयार, कथित VIP viral video चे गूढ उकलणार

स्मशानभूमीजवळ PM मोदींचा फोटो, भोवती सुई टोचलेलं लिंबू, नारळ अन् कुंकू; व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांची कारवाई

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT