sakal
पुणे

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना ‘जिजामाता विद्वत्‌ गौरव पुरस्कार’

नागपूर-पुणे येथील छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ‘जिजामाता विद्वत्‌ गौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना प्रदान केला जाणार आहे.

मिनाक्षी गुरव

पुणे : नागपूर-पुणे येथील छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ‘जिजामाता विद्वत्‌ गौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना प्रदान केला जाणार आहे. एक लाख ५१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रतिष्ठानतर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

पुरस्काराचे यंदाचे हे ४० वे वर्ष आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजेय देशमुख यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार वितरणाचा जाहीर कार्यक्रम घेता येणार नसल्याचेही प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले आहे. प्रतिष्ठानच्या वतीने आतापर्यंत चित्रपट दिग्दर्शक भालजी पेंढारकर, साहित्यिक गो. नी. दांडेकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर अशा मान्यवरांना ‘जिजामाता विद्वत्‌ गौरव पुरस्कारा’ने गौरविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: व्हिसा नसताना भारतात आला, 72 लाखांच्या कोकेनसह पोलिसांनी पकडला

Pune News : पॉवरफुल पदावरील नावाचा सस्पेंस संपला! वाघमारे यांच्यानंतर पावसकर होणार शहर अभियंता

सोलापूरकरांनो, लक्षात ठेवाच! मंगळवेढ्याकडे जाणारा ‘हा’ रस्ता १ वर्षासाठी बंद; त्या रोडवरील वाहनांसाठी ‘हे‘ ४ पर्यायी रस्ते, १४ डिसेंबरला पडणार रेल्वेचा पूल

Mephedrone Seized : हडपसरमध्ये मेफेड्रोन विक्री करणाऱ्यास अटक, ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

PMPML : अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर ‘पीएमपी’चा भार; लिपिक पदाच्या तब्बल ३९० जागा रिक्त

SCROLL FOR NEXT