Sakal-Exclusive
Sakal-Exclusive 
पुणे

संवेदनशीलतेने तोडल्या दोन देशांच्या सीमाभिंती; पोलिसांकडून बांगलादेशी गर्भवती महिलेची सेवा-सुश्रूषा

पांडुरंग सरोदे@spandurangSakal

पुणे - इंटरपोलवरून मिळालेल्या माहितीवरून पुणे पोलिसांनी ‘त्या’ बांगलादेशी महिलेचा शोध घेतला. तिची वैद्यकीय तपासणी केली, तेव्हा ती गर्भवती असल्याचे समजले. तिला मायदेशी पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या; मात्र तेवढ्यात लॉकडाउन लागले आणि त्या हालचालींवर पाणी फिरले. अशा परिस्थितीतही पुणे पोलिसांनी धैर्याने तोंड देत तिचे बाळंतपण केले. आपल्याच कुटुंबातील सदस्याप्रमाणे सेवा-सुश्रुषा करत तिचे हट्टही पुरविले. काही दिवसांपूर्वीच त्या मायलेकीला पुणे पोलिसांनी मायभूमीमध्ये सुखरूप पोचविले. या घटनेमुळे माणुसकीच्या नात्यापुढे दोन देशांच्या सीमाही अक्षरशः नतमस्तक झाल्या !

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या काळात पुणे पोलिसांमधील माणुसकीचे दर्शन घडविणारी ही एक घटना. खरं तर कोरोनाने आपल्यातील खरा माणूस दाखवून दिला. बहुतांश लोकांच्या वाट्याला कटू अनुभवच अधिक आहेत; मात्र ‘ती’ नशिबवान ठरली. 
फौजिया (नाव बदललेले आहे) मूळची बांगलादेशची. भारत-बांगलादेशाच्या सीमेवर तिचे गाव. तेथील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. ते दोघेही तेथून थेट पुण्याला पळून आले आणि विवाह केला. दरम्यान, तिच्या आई-वडिलांनी तिच्या बेपत्ताची बांगलादेश पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

कसा लागला शोध?
दरम्यान, फौजिया पुण्यात असल्याची माहिती इंटरपोलद्वारे पुणे पोलिसांना मिळाली. तिचा शोध घेतला असता ती चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळून आली. पोलिसांच्या भीतीने तिचा पती पळून गेला. तिची वैद्यकीय तपासणी झाली, तेव्हा ती गर्भवती असल्याचे समजले. पोलिसांनी तिला परत पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यासाठी ट्रॅव्हल परमिटही मिळाले; मात्र त्याचवेळी लॉकडाऊन लागले आणि इथेच संकटांचा पाढा सुरू झाला.

महिला पोलिसच आई-बहीण!
फौजिया गर्भवती असल्यामुळे तिचे खाणे-पिणे, नियमित सोनोग्राफी, औषधे, वैद्यकीय चाचण्या करण्याचे काम गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिस हवालदार राजश्री मोहिते, पोलिस नाईक नीलम शिंदे, मनीषा पुकाळे, अश्‍विनी केकान यांनी केले. 

आजारपणाने वाढली प्रतीक्षा 
फौजियाच्या बाळाचे ट्रॅव्हल परमिट येण्यास विलंब होत असल्याने फक्त तिला पाठविण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली होती; मात्र तिने बाळाला घेऊन जाण्याचा हट्ट धरला. त्यातच बाळाला आजारपण आले. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाळासह तिला बांगलादेशला सुखरूप पाठवून दिले. पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांच्यासह वैशाली चांदगुडे, अनघा देशपांडे, श्रीधर खडके यांनीही विशेष प्रयत्न केले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT