पुणे

कर्करुग्णांकरिता स्वतंत्र हॉस्पिटल 

सकाळवृत्तसेवा

पुणे - अभिप्राय मांडण्यास विलंब लावल्याने सहा महिने रेंगाळलेल्या कर्करुग्णांकरिता स्वतंत्र हॉस्पिटलच्या प्रस्तावावरील धूळ बुधवारी  झटकण्यात आली असून, या योजनेला महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने मंजुरी दिली. शुक्रवार पेठेतील महापालिकेच्या मिळकतीमध्ये हे  हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. कर्करुग्णांना सर्व प्रकारचे उपचार अल्पदरात देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. 

या रुग्णांसाठी प्रथमच महापालिकेने ही सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला असून, विशेष म्हणजे, तिचे खासगीकरण न करता महापालिकेच्या आरोग्य खात्यामार्फत हॉस्पिटल चालविण्याचा प्रयत्न असेल, असे समितीच्या अध्यक्ष राजश्री नवले यांनी तूर्तास तरी म्हटले आहे. 

कर्करुग्णांना उपचाराकरिता शहरी गरीब योजनेंतर्गत दोन लाख रुपयांची मदत केली जाते. मात्र, उपचार आणि त्यावरील खर्च लक्षात घेता, स्वतंत्र हॉस्पिटल सुरू करण्याचा प्रस्ताव नगरसेवक अजय खेडेकर आणि सम्राट थोरात यांनी मांडला होता. त्यावर समितीच्या बैठकीत चर्चा झाली. काही त्रुटी असल्याचे 

कारण सांगत, प्रस्ताव अभिप्रायासाठी पाठविण्यात आला. त्यानंतर संबंधित प्रस्ताव फारसा गांभीर्याने घेण्यातच आला नाही. तरीही, ही योजना सुरू करणार असल्याचा गाजावाजा करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र कार्यवाही होत नसल्याने प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजीचा सूर होता. यासंदर्भातील अभिप्रायावर चर्चा करून तो प्रस्ताव मंजूर करण्यात आला. 

गरीब आणि गरजू रुग्णांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. त्याकरिता शहराच्या मध्यवर्ती भागातील जागेत हॉस्पिटल सुरू करण्यात येईल, असे नवले यांनी सांगितले. 

योजना खासगीकरणातून राबविण्याचा घाट 
शहरात फुटकळ कामांवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जात असताना कर्करुग्णांसाठीचे हॉस्पिटल मात्र सार्वजनिक भागीदारीतून (पीपीपी) किंवा बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर सुरू करण्याचा घाट महापालिका प्रशासनाने घातला आहे. योजना जाहीर होताच, ती खासगीकरणातून  राबविण्याचा आग्रह प्रशासनातील काही अधिकारी करीत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. त्यापलीकडे जाऊन अशा योजना कोणाच्या घशात घालायचे, याचेही नियोजन आतापासून केल्याचा संशय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup मधून बाहेर पडल्यानंतर इंग्लंड मायदेशी मग आम्हीच भारतात का अडकलो? द. आफ्रिका-वेस्ट इंडिज खेळाडू ICC वर तापले

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा थाटात पार पडला विवाहसोहळा! नवरा आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेता

Latest Marathi News Live Update : रंगपंचमी निमित्ताने पोलिसांकडून कोल्हापूर-गगनबावडा रोडवर वाहनांची तपासणी

Mahatma Phule Jan Arogya Yojana: गरजू रुग्णांना मोठा दिलासा; महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून २३९९ प्रकारच्‍या आजारांवर उपचार

Gujarat Crime: प्रसिद्ध मंदिराच्या बाथरूममध्ये दोन विद्यार्थिनी आढलल्या मृतावस्थेत ; ChatGPT ला विचारली जीवन संपवण्याची पद्धत

SCROLL FOR NEXT