Covishield vaccine esakal
पुणे

Corona Update: कोव्हिशिल्डचं उत्पादन पुन्हा सुरु; पुनावालांसमोर 'इतक्या' डोसचं टार्गेट

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : राज्यासह देशभरात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये लस उपलब्ध नसल्याची ओरड होत आहे. करोनाच्या रुग्णांमध्ये कमालीची घट झाल्यानं या लशींचं उत्पादनही थांबवण्यात आलं होतं. पण आता हे उत्पादन पुन्हा सुरु करण्यात आलं आहे. (Serum Institute of India restarts manufacturing Covishield vaccines says CEO Adar Poonawalla)

कोव्हिशिल्ड लशीचं उत्पादन घेणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं देखील या लशीचं उत्पादन पुन्हा सुरु केलं आहे. पुढील ९० दिवसांत अर्थात तीन महिन्यात ६ ते ७ मिलियन अर्थात ७० लाख कोविशिल्ड लशीचे डोस तयार करण्याचं आमचं टार्गेट असल्याची माहिती सिरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या चोवीस तासांत १,११५ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ५६० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यात एकूण सक्रीय रुग्णांची संख्या ५४२१ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९८.११ टक्के असून मृत्यूचा दर १.८२ टक्के आहे.

तसेच राज्यातील बडी शहरं असलेल्या मुंबई, पुणे आणि नागपूर इथल्या विमानतळांवर परदेशातून भारतात येणाऱ्या नागरिकांची स्क्रीनिंग केलं जात आहे. या सर्वांचं थर्मल स्कॅनिंग केलं जात असून यांपैकी २ टक्के प्रवाशांची रँडमली कोविड चाचणीही केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: ''कितीही दबाव आला तरी आम्ही सहन करू'', 'ट्रम्प टॅरिफ'वरुन मोदी स्पष्ट बोलले

AI Use in Ganeshotsav Crowd गणेशोत्‍सवातील गर्दीच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी ‘एआय’चा वापर

ED Action: धर्मांतर टोळीचा मास्टरमाइंड चांगूर बाबाला 'मनी लाँड्रिंग' प्रकरणात ‘ED’चा दणका!

सरकारचा आदेश निघाला! ५२ हजार २७६ शिक्षकांसाठी मोठा निर्णय, अशंत: अनुदानावरील शाळांना २० टक्के वाढीव टप्पा अनुदान मंजूर, १ ऑगस्टपासून मिळणार अनुदान

Latest Marathi News Updates: निफाड साखर कारखान्याला पिंपळस ग्रामपालिकेडून सील

SCROLL FOR NEXT